IND vs BAN, Pitch Report : न्यूझीलंड दौऱ्यानंतर भारतासमोर आता बांगलादेशचं (India vs Bangladesh) संघाचं आव्हान असून तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला वन डे सामना आज होणार आहे. आगामी एकदिवसीय विश्वचषकापूर्वी भारत जास्तीत जास्त एकदिवसीय सामने खेळणार आहे, त्या दृष्टीने आजचा सामना ही महत्त्वाचा असून या सामन्यापूर्वी मैदानाची स्थिती अर्थात पिच रिपोर्ट (Pitch Report) कसा असेल? याबाबत जाणून घेणंही अत्यंत महत्त्वाचं आहे.


सामना होणाऱ्या ढाका येथील शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी मदत देणारी असून फलंदाजीसाठीही चांगली आहे. पण आऊटफिल्ड स्लो असल्याने शॉट्स खेळताना फलंदाजांना मेहनत घ्यावी लागणार आहे. शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना सरासरी स्कोअर 226 आहे. भारताने या ठिकाणी सर्वाधिक 370-4 इतक्या धावा केल्या आहेत. आजवर चेस करणाऱ्या संघांनी या ठिकाणी 113 पैकी 59 वेळा विजय मिळवला आहे. त्यामुळे आजही नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी घेण्याची शक्यता आहे.


कसा आहे आजवरचा इतिहास?


भारतीय संघ 36 वेळा बांगलादेशसमोर (India vs bangladesh) मैदानात उतरला आहे. आजवर खेळवल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाचं पारडं कमालीचं जड राहिल्याचं दिसून आलं आहे. भारताने 36 पैकी 30 सामन्यात विजय मिळवला आहे. तर, बांगलादेश संघाला 5 सामने जिंकता आले आहेत. तर एक सामना अनिर्णीत राहिला आहे.


कसा आहे भारतीय संघ?


रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (विकेटकिपर), इशान किशन (विकेटकिपर), शाहबाज अहमद, अक्षर पटेल ,वॉशिंग्टन सुंदर , शार्दुल ठाकूर , मोहम्मद. सिराज, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.


कुठे होणार लाईव्ह स्ट्रिमिंग


भारतीय वेळेनुसार भारत विरुद्ध बांगलादेश हा पहिला एकदिवसीय सामना आज सकाळी 11.30 वाजता खेळवला जाईल. त्यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक होणार आहे. या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच Sony Liv अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं.  याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.   


हे देखील वाचा-