India vs Bangladesh, ODI Record : भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात आजपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत आहे. न्यूझीलंडविरुद्धची एकदिवसीय मालिका भारताने 1-0 ने गमावली. त्या मालिकेतील दोन सामने पावसामुळे पूर्ण होऊ शकले नाहीत. ज्यानंतर बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेने भारताला पुन्हा नवी सुरुवात करता येणार आहे. दरम्यान आजचा सामना जिंकणारा संघ मालिकेत आघाडी घेऊ शकतो त्यामुळे मालिकेच्या दृष्टीने हा सामना महत्त्वाचा असल्याने या सामन्यापूर्वी दोन्ही संघाचा आजवरचा एकमेंकाविरुद्धचा इतिहास जाणून घेऊ...


आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांचा विचार करता भारतीय संघ तब्बल 36 वेळा बांगलादेशसमोर (India vs bangladesh) मैदानात उतरला आहे. आजवर खेळवल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाचं पारडं कमालीचं जड राहिल्याचं दिसून आलं आहे. भारताने 36 पैकी 30 सामन्यात विजय मिळवला आहे. तर, बांगलादेश संघाला 5 सामने जिंकता आले आहेत. तर एक सामना अनिर्णीत राहिला आहे.


कधी, कुठे पाहू शकता आजचा सामना?




भारत विरुद्ध बांगलादेश या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच Sony Liv अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं.  याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.   


कसे आहेत दोन्ही संघ?


टीम इंडिया : 


रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (विकेटकिपर), इशान किशन (विकेटकिपर), शाहबाज अहमद, अक्षर पटेल ,वॉशिंग्टन सुंदर , शार्दुल ठाकूर , मोहम्मद. सिराज, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.


टीम बांगलादेश : 


लिटन दास (कर्णधार), नजमुल हुसेन शांतो, यासिर अली, शकीब अल हसन, महमुदुल्ला, मेहदी हसन मिराझ, अफिफ हुसैन ध्रुबो, इबादोत हुसेन, अनामूल हक, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), नुरुल हसन, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, मुस्तफिजुर रहमान, आणि तस्किन अहमद


अशी असू शकते भारताची अंतिम 11



सलामीवीर - रोहित शर्मा, शिखर धवन


मिडिल ऑर्डर फलंदाज - विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर


ऑलराउंडर- अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर 


गोलंदाज - मोहम्मद. सिराज, दीपक चहर, उमरान मलिक. 



हे देखील वाचा-