India vs Australia Womens Semifinal: ICC T20 महिला विश्वचषक 2023 मध्ये आज (23 फेब्रुवारी) पहिला सेमीफायनल (Womens World Cup Semifinal) सामना खेळवला जाईल, ज्यामध्ये भारतीय संघ (Team India) ऑस्ट्रेलियाशी (Australia) भिडणार आहे. हा सेमीफायनलचा सामना दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघाची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. ऑस्ट्रेलियाला पराभूत करून अंतिम फेरीत आपलं स्थान पक्कं करण्याच्या इराद्यानंच टीम इंडिया मैदानात उतरणार आहे.


सेमीफायनलचा सामना जिंकणं तसं पाहायला गेलं तर भारतीय संघासाठी फारसं सोपं नसणार आहे. कारण भारतीय महिला संघाचा कांगारू संघाविरुद्ध टी-20मधील रेकॉर्ड फारसा चांगला नाही. जर टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवण्यात आलेले शेवटचे पाच सामने पाहिले तर त्यातही भारतीय संघ मागे पडल्याचं दिसतंय. 


ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडिया कमकुवत 


ऑस्ट्रेलियाविरुद्धचा टी-20 रेकॉर्ड पाहिला, तर भारतीय संघाची बाजू कमकुवत असल्याचं दिसतंय. दोन्ही संघांमधील मागील पाच सामन्यांमध्ये केवळ कांगारू संघानं 4 वेळा विजय मिळवला आहे. तर भारतीय संघाला केवळ एका सामन्यात विजय मिळाला आहे. टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग तीन सामने गमावले आहेत. अशा स्थितीत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील खेळणारा भारतीय संघ यावेळीही काहीसा दडपणाखाली दिसतोय. 


हेड-टु-हेड 


एकूण टी-20 रेकॉर्ड पाहिल्यास भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध खूपच कमकुवत दिसत आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 30 टी-20 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये भारतीय संघाने केवळ 6 सामने जिंकले आहेत. तर 22 सामन्यांमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच, एक सामना बरोबरीत राहिला, तर एक सामना अनिर्णीत राहिलाय. 


भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला T20 विक्रम


एकूण टी 20 सामने : 30
टीम इंडियानं जिंकलेले सामने : 6
ऑस्ट्रेलियानं जिंकलेले सामने : 22
बरोबरीत सुटलेला सामना : 1
अनिर्णीत राहिलेला सामना : 1


आजच्या सामन्यासाठी संभाव्य संघ 


हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृति मंधाना, शेफाली वर्मा, यस्तिका भाटिया (विकेटकीपर), ऋचा घोष (विकेटकीपर), जेमिमा रोड्रिग्स, हरलीन देओल, दीप्ति शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणुका सिंह, पूजा वस्त्राकर, अंजलि सरवानी, राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे


रिजर्व प्लेयर : एस. मेघना, स्नेह राणा आणि मेघना सिंह.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


फायनलमध्ये कोण जाणार? भारत-ऑस्ट्रेलियात अटीतटीची लढत, पाहा A टू Z माहिती