IPL 2023 SRH New Captain : आयपीएल 2023 चं वेळापत्रक नुकतेच जाहीर झालं. त्यानंतर दहा संघांनी आपली तयारी सुरु केली आहे. यामध्ये हैदराबाद संघाही मागे नाही. पण यंदा हैदराबाद संघाला कर्णधारापासून सुरुवात करायची आहे. विल्यमसनला रिलीज केल्यानंतर हैदराबादचं नेतृत्व कोण कराणार? याकडे आयपीएल प्रेमींचं लक्ष लागलं होतं. याचं उत्तर गुरुवारी मिळणार आहे.  सनरायजर्स हैदराबाद संघानं ट्वीट करत याची माहिती दिली. 


सनरायजर्स हैदराबाद संघ नव्या कर्णधाराच्या शोधात आहे. कोण असेल कर्णधार, याबाबत अद्याप कोणताही माहिती समोर आलेली नाही. पण 23 फेब्रुवारी रोजी नव्या कर्णधाराची घोषणा होणार आहे. पाहूयात कर्णधारपदासाठी कोण कोण स्पर्धेत आहे....?
 
एडन मार्करम


सनराइजर्स हैदराबादच्या कर्णधारपदाच्या स्पर्धेतील सर्वात पहिलं नाव एडन मार्करम याचं आहे. दक्षिण आफ्रिकेचा हा अष्टपैलू खेळाडू अल्पवधीतच भारतात प्रसिद्ध झाला आहे. त्याशिवाय दक्षिण आफ्रिकेच्या संघाचं नेतृत्व केल्यामुळे कर्णधारपदाचा अनुभवही आहे. तसेच तो विश्वचषक जिंकणारा एकमेव दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार आहे. मार्करम याने 2014 मध्ये दक्षिण आफ्रिकेला अंडर 19 विश्वचषक जिंकून दिला होता. अशात एडन मार्करम कर्णधार होऊ शकतो. 


भुवनेश्वर कुमार


भुवनेश्वर कुमार याने याआधाही हैदराबाद संघाचं नेतृत्व केले आहे. तो गेल्या अनेक वर्षांपासून हैदराबाद संघाचा भाग आहे. त्यामुळे भुवनेश्वर कुमावर याच्यावर नेतृत्वाची जबाबदारी देऊ शकतात.  


मयांक अग्रवाल


यंदाच्या लिलावात हैदराबादने मयांक अग्रवाल याला खरेदी केलं. मयांक अग्रवाल याने पंजाब संघाचं नेतृत्व केलेय. मयांकचाही हैदराबाद संघ कर्णधार म्हणून विचार करत असेल. 
 





आयपीएलच्या सर्व संघाचे कर्णधार  


सनरायजर्स हैदराबाद – 


रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर - फाफ डु प्लेसिस


चेन्नई सुपर किंग्स- महेंद्र सिंह धोनी


 कोलकाता नाइट रायडर्स- श्रेयस अय्यर


 पंजाब किंग्स – शिखर धवन


 दिल्ली कॅपिटल्स- ऋषभ पंत (दुखापतीमुळे यंदा दुसऱ्याकडे जबाबदारी जाऊ शकते)


राजस्थान रॉयल्स- संजू सॅमसन


मुंबई इंडियन्स- रोहित शर्मा


लखनौ सुपर जायंट्स- केएल राहुल


गुजरात टायटन्स- हार्दिक पांड्या


आयपीएल स्पर्धा कधीपासून


बीसीसीआयने आयपीएलच्या 16 व्या हंगामाचं वेळापत्रक जाहीर केले आहे. 31 मार्च ते 28 मे यादरम्यान आयपीएलचा थरार रंगणार आहे. गतविजेते गुजरात आणि चेन्नई यांच्यात पहिला सामना होणार आहे.  21 मेपर्यंत लीग सामने होणार आहेत. त्यानंतर उपांत्य फेरीचे सामने रंगणार आहेत. तर 28 मे रोजी फायनलचा थरार पाहायला मिळेल. आयपीएल 2023 मध्ये एकूण 74 सामने होणार आहेत. लीग राऊंडमध्ये दहा संघ प्रत्येकी 14-14 सामने खेळणार आहे. याप्रमाणे 10 संघामध्ये 70 सामने होणार आहेत. त्यानंतर प्लेऑफचे चार सामने होणार आहेत. 28 मे रोजी फायनलचा थरार रंगणार आहे. आयपीएल 2023 चं आयोजन भारतातच होणार आहे. देशभरातील 12 मैदानावर सामने रंगणार आहेत. दहा संघांना दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे. अ ग्रुपमध्ये मुंबई, राज्यस्थान, दिल्ली आणि लखनौ संघाचा सहभाग आहे. तर ब गटामध्ये चेन्नई, पंजाब, हैदराबाद, आरसीबी आणि गुजरात या संघाचा समावेश आहे.