India vs Australia World Cup 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चेपॉकच्या मैदानावर सामना सुरु आहे. भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना 199 धावांत रोखले. प्रत्युत्तरदाखल ऑस्ट्रेलियानेही जोरदार प्रत्युत्तर देत सामन्यात रोमांच निर्माण केला. अवघ्या दोन धावांत भारताच्या तीन फलंदाजांना तंबूत धाडत ऑस्ट्रेलियाने सामन्यात कमबॅक केले होते. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी भारताच्या आघाडीच्या तीन फलंदाजांना शून्यावर बाद केले होते. भारतीय क्रिकेटच्या इतिहास हे पहिल्यांदाच झाले. टॉप ऑर्डरचे तीन फलंदाज शून्यावर बाद होण्याची पहिलीच वेळ होय. एकप्रकारे भारतीय क्रिकेटवर कलंक लागला असे म्हटले तर वावगे वाटायला नको. ईशान किशन, रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांना खातेही उघडता आले नाही.
200 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात लाजीरवाणी झाली होती. अवघ्या दोन धावांवर तीन आघाडीचे फलंदात जंबूत परतले. रोहित शर्माने सहा चेंडूचा सामना केला, पण एकही धाव काढता आली नाही. हेजलवूडने रोहित शर्माला तंबूत धाडले. इशान किशन दुसऱ्या चेंडूवर बाद झाला. मिचेल स्टार्कच्या चेंडूवर तो गोल्डन डकचा शिकार झाला. श्रेयस अय्यरने तीन चेंडूचा सामना केला, पण खाते उघडता आले नाही. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आघाडीचे तीन फलंदाज शून्यावर बाद होण्याची पहिलीच वेळ होय.
हाही लाजिरवाणा विक्रम टीम इंडियाच्या नावावर -
याआधी 1983 च्या विश्वचषकात भारतीय सलामी फलदाज झिम्बॉब्वेच्या गोलंदाजाविरोधात शून्यावर तंबूत परतले होते. झिम्बॉब्वेच्या भेदक माऱ्यापुढे भारतीय फंलदाजांनी नांगी टाकली होती. भारतीय सलामी फलंदाज सुनील गावसकर आणि के श्रीकांत यांना एकही धाव काढता आली नाही. टुनब्रिज येथे झालेल्या सामन्यात दुसऱ्या चेंडूव गावसकर शून्यावर तंबूत परतले होते. तर 13 व्या चेंडूवर श्रीकांत बाद झाला होता. आजच्या सामन्यात रोहित आणि इशान शून्यावर बाद झाले.
दोन धावांत तीन फलंदाज शून्यावर बाद -
भारताचा सलामीवीर रोहित शर्मा, ईशान किशन आणि त्यानंतर आलेला श्रेयस सुद्धा अगदी खातं न उघडताच तांबूत परतल्याने भारताची अवस्था तीन बाद दोन धावा अशी झाली. ऑस्ट्रेलियाच्या मिशेल स्टार्कने चौथ्याच चेंडूवर इशान किशनला भोपळाही फोडू न देता माघारी धाडले. त्यानंतर दुसऱ्या षटकात हेजलवुडने तगडा हादरा दिला. कप्तान रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरला एकाच ओव्हरमध्ये माघारी धाडत भारताची अवस्था 3 बाद 2 धावा अशी करून टाकली.
आणखी वाचा :