ICC ODI World Cup 2023, Virat Kohli : रनमशीन विराट कोहलीने विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात अनेक विक्रम केले आहे. दोन धावांत तीन बाद... अशा कठीण परिस्थितीत विराट कोहलीने केएल राहुलच्या साथीने भारताचा डाव सावरला. विराट कोहलीने 85 धावांची झुंजार खेळी केली. विराट कोहलीने 116 चेंडूत सहा चौकारांच्या मदतीने 85 धावांची खेळी केली. विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीचा संयमी सामना केला. त्याने राहुलच्या साथीने भारताच्या डावाला आकार दिला. दोघांनीही एकेरी दुहेरी धावसंख्यावर भर देत धावसंख्या हालती ठेवली. विराट कोहली आणि केएल राहुल यांनी चौथ्या विकेटसाठी 215 चेंडूत 165 धावांची भागिदारी केली. विराट कोहलीने 85 धावांच्या खेळीसह विक्रमांची रांग लावली. विराट कोहलीने केलेले विक्रम पाहूयात..
विराट कोहलीने विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात कोण कोणते विक्रम केले ?
केएल राहुल आणि विराट कोहली यांची दीडशतकी भागिदारी झाली आहे. विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरोधातील ही आतापर्यंतची सर्वोत्तम भागिदारी होय.
एकदिवसीय फॉर्मेटमध्ये सर्वाधिक वेळा 50 पेक्षा जास्त धावा (नॉन ओपनर) विराट कोहलीच्या नावावर जमा झाल्या आहेत. 270 डावात विराट कोहलीचा 114 वा 50 प्लस स्कोर होय.
विराट कोहलीने तिसऱ्या क्रमांकावर 11 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. तिसऱ्या क्रमांकावर 11 हजार धावा करणारा विराट कोहली पहिलाच खेळाडू आहे.
विराट कोहली विश्वचषकात सर्वाधिक धावा (नॉन ओपनर) करणारा फलंदाज झाला आहे.
आयसीसीच्या व्हॉइट बॉल स्पर्धेत भारातकडून सर्वाधिक धावा करणारा विराट कोहली पहिला खेळाडू ठरला आहे. विराट कोहलीने 24 डावात 2720 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्याने सचिनचा विक्रम मोडला. सचिन तेंडुलकरने 58 डावात 2719 धावा केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा आहे. रोहित शर्माने 64 डावात 2422 धावा केल्या आहेत.
वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणारा विराट कोहली दुसरा भारतीय खेळाडू झाला आहे. विराट कोहलीच्या नावावर जवळपास 1100 धावांची नोंद झाली आहे. सचिन तेंडुलकर 2278 धावांसह पहिल्या स्थानावर कायम आहे. सौरव गांगुली 1006 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
विराट कोहलीने विश्वचषकात सर्वाधिक झेल घेणारा भारतीय खेळाडू म्हणून मान मिळवला. विराट कोहलीने विश्वचषकाच्या 27 डावामध्ये 15 झेल घेतले आहेत. 2011 ते 2023 यादरम्यान विराट कोहलीचा हा चौथा विश्वचषक आहे. या विश्वचषकातील 27 सामन्यात विराट कोहलीने 15 झेल घेतले आहेत. अनिल कुंबळे याने 18 सामन्यात 14 झेल घेतले आहेत. सचिन तेंडुलकर याला 44 सामन्यात फक्त 12 झेल घेता आलेत.