Australia vs India 4th Test Weather Report : बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील या मालिकेतील चौथा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये खेळवला जाणार आहे. मागील कसोटीप्रमाणे हा सामना भारतीय वेळेनुसार पहाटे 5 वाजता सुरू होईल. हा सामना अनेक दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. भारताने ही कसोटी गमावल्यास WTC फायनलमध्ये पोहोचण्याचा त्यांचा मार्ग कठीण होईल. दरम्यान, गेल्या सामन्याप्रमाणे इथेही पाऊस खलनायक का? हा मोठा प्रश्न आहे. अशा परिस्थितीत या सामन्याच्या प्रत्येक दिवशी हवामान काय भूमिका बजावेल हे जाणून घेऊया.
भारत-ऑस्ट्रेलियाची बॉक्सिंग डे कसोटी होणार रद्द?
ऑस्ट्रेलियाच्या हवामानच्या अंदाजानुसार, चौथ्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटीच्या पहिल्या दिवशी मेलबर्नमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. पहिल्या दिवशी (26 डिसेंबर) पावसाची 50% शक्यता आहे, संध्याकाळी जोरदार वारे अपेक्षित आहेत. अशा परिस्थितीत कसोटी सुरू होण्यापूर्वी पाऊस सुरू झाला तर हा सामना रद्द होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याची शक्यता शून्य आहे.
दुसऱ्या दिवशीही असाच धोका आहे, सकाळी पाऊस पडू शकतो. तथापि, पावसाची केवळ 30% शक्यता आहे, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या दिवशी कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे संपुर्ण खेळ होण्याची शक्यता आहे.
मेलबर्नमध्ये भारताचा विक्रम
मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवरील भारताच्या विक्रमाबद्दल बोलायचे तर, त्याने 14 पैकी 4 कसोटी जिंकल्या आहेत आणि 8 गमावल्या आहेत. एमसीजीमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करण्याची संधी असलेल्या विराट कोहलीवर लक्ष केंद्रित केले जाईल. पर्थ कसोटीत कोहलीने शतक झळकावले, पण त्यानंतर त्याची बॅट शांत राहिली. दुसरीकडे, जसप्रीत बुमराहने तीन सामन्यांत 21 विकेट घेत गोलंदाजीत जबाबदारी स्वीकारली आहे. मेलबर्नमध्येही त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे.
भारताचे संभाव्य प्लेइंग-11 : यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, रोहित शर्मा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप.
ऑस्ट्रेलियाने प्लेइंग-11 : उस्मान ख्वाजा, सॅम कॉन्स्टन्स, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.
हे ही वाचा -