Vinod Kambli hospital : भिवंडीतील आकृती हॉस्पिटलमध्ये माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्यावर उपचार सुरू आहे. कांबळी हे आयसीयूमध्ये असून त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर त्यांच्या प्रकृतीबाबत सातत्याने अपडेट्स देत आहेत. डॉक्टर विवेक त्रिवेदी यांनी सांगितले की, कांबळी यांना काही दिवसांपूर्वी युरिन इन्फेक्शनमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत.
आज ख्रिसमस डे असल्याने हॉस्पिटल प्रशासनाने मोठे पाऊल उचलले आणि ख्रिसमस डे निमित्त विनोद कांबळीसाठी त्यांनी मोठे गिफ्ट दिले. खरंतर, हॉस्पिटल प्रशासनाकडून त्यांना एका वेगळ्या रूम मध्ये शिफ्ट केल्या जाणार आहे. ज्या रूममध्ये ख्रिसमस डेची संपूर्ण सजावट करण्यात आली आहे. जेणेकरून त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना घरी ख्रिसमस डे साजरा करत आहोत तसा अनुभव देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी संपूर्ण तयारी हॉस्पिटल प्रशासनाकडून केली गेली.
श्रीकांत शिंदे मदतीसाठी आले पुढे
दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या फाउंडेशनने कांबळीला मदतीचा हात पुढे केला आहे. महाराष्ट्र उपमुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले की, एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार त्यांचे ओएसडी मंगेश चिवटे मंगळवारी रात्री रुग्णालयात गेले आणि माजी क्रिकेटपटूच्या प्रकृतीची विचारपूस केली. चिवटे यांनी रुग्णालयातील डॉक्टरांशी संवाद साधत कांबळी यांना अधिक चांगल्या वैद्यकीय सुविधा द्याव्यात, असे सांगितले.
श्रीकांत शिंदेकडून 5 लाखांची मदत
एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि कल्याणचे लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी कांबळी यांना 5 लाखांची आर्थिक मदत जाहीर केली. पुढील आठवड्यात डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनतर्फे ही मदत देण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. चिवटे यांच्या म्हणण्यानुसार, श्रीकांत शिंदे यांनी कांबळी आणि त्यांच्या कुटुंबीयांना पुढील मदतीचे आश्वासन दिले आहे. कांबळी यांनी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले आहेत. या माजी क्रिकेटपटूनेही उपमुख्यमंत्र्यांना भेटून त्यांचे आभार मानण्याची इच्छा व्यक्त केली. एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे लवकरच कांबळीला पाहण्यासाठी रुग्णालयात जाणार आहेत.
हे ही वाचा -