Ind vs Aus 4th Test : रोहित शर्माचा मास्टर स्ट्रोक! KL राहुलचा नाही तर 'या' खेळाडूचा चौथ्या कसोटीतून पत्ता कट?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफीची चौथी बॉक्सिंग डे कसोटी 26 डिसेंबरपासून मेलबर्नच्या मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळवली जाणार आहे. या सामन्यापूर्वी समोर आलेल्या अपडेटमध्ये असे सांगण्यात आले की, भारतीय कर्णधार रोहित शर्मा त्याच्या जुन्या पोझिशनमध्ये म्हणजेच ओपनिंग करताना दिसू शकतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआतापर्यंत खेळल्या गेलेल्या तीन कसोटींमध्ये केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल सलामीला आले होते. त्यामुळे भारतीय कर्णधार सलामीला आल्यास केएल राहुलला प्लेइंग इलेव्हनमधून काढून टाकले जाईल का? हा प्रश्न पडतो.
मालिकेतील तीन कसोटी सामन्यांच्या 6 डावात फलंदाजी करताना राहुलने 47.00 च्या सरासरीने 235 धावा केल्या आहेत. या मालिकेत तो भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.
भारतीय कर्णधार आतापर्यंत मालिकेतील दोन्ही कसोटींमध्ये फ्लॉप दिसला आहे. त्याचवेळी सलामीला खेळलेल्या केएल राहुलच्या बॅटमधून धावा आल्या आहेत.
रोहित शर्मा पर्थ येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटीत उपलब्ध नव्हता, त्याच्या अनुपस्थितीत केएल राहुल सलामी करताना दिसला. त्यानंतर रोहित शर्माच्या पुनरागमनानंतरही पुढील दोन कसोटींमध्ये सलामीची जबाबदारी राहुलने घेतली.
मात्र, बॉक्सिंग डे कसोटीत रोहित शर्माच्या सलामीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.