Ind vs Aus, LIVE Score Updates : पहिल्या दिवसाचा खेळ संपला, भारताच्या 6 विकेटच्या बदल्यात 233 धावा

India vs Australia Adelaide Test Live Score updates : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेतली पहिला डे-नाईट सामना आजपासून एडिलेडवर सुुरु होत आहे. भारतासाठी खेळाचं हे नवं स्वरुप अतिशय नवखं आहे, त्यामुळंच ऑस्ट्रेलियाचा संघ इथं अधिक भक्कम स्थानी दिसत आहे. पण तरी देखील एडिलेडमध्ये भारतीय संघानं केलेलं प्रदर्शन पाहता ही संघासाठी जमेची बाजू ठरु शकते.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 17 Dec 2020 05:32 PM
पहिल्या दिवसाअखेर भारताने 6 विकेटच्या बदल्यात 233 धावा केल्या आहेत. अश्विन 17 चेंडूत नाबाद 15 धावा आणि ऋद्धिमान साहा 25 चेंडूत नाबाद 9 धावांवर खेळत आहेत. तिसऱ्या सत्रातील खेळावर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलं.
दुसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी चांगलं प्रदर्शन केलं. यामध्ये पुजाराची विकेट घेण्यात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना यश आलं आहे. टीम इंडियाला या सत्रात अजिंक्य रहाणे आणि विराट कोहलीच्या चांगल्या भागिदारीची अपेक्षा आहे.
संथ फलंदाजी केल्याबद्दल अनेकदा टीकेचा बळी ठरणारा पुजारा आपल्या जुन्या शैलीत फलंदाजी करीत आहेत. पुजाराने 100 चेंडूत 18 धावा केल्या आहेत. पुजाराने आपल्या फलंदाजीबद्दल म्हटले आहे, की जेव्हा आवश्यक असेल तेव्हा जलदगतीने धावा करण्याची क्षमता ठेवतो. पण टीम इंडिया सध्या ज्या वेगात खेळत आहे, त्याप्रमाणे दिवसाचा खेळ संपेपर्यंत 200 धावा करणं देखील टीम इंडियाला अवघड आहे.
पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियन गोलंदाजी भारतीय फलंदाजांवर हावी झालेली पाहायला मिळाली. डिनर ब्रेकपर्यंतच्या पहिल्या सत्रात टीम इंडियाची धावसंख्या 2 बाद 41 धावा अशी झाली आहे. पुजारा 17 तर विराट कोहली पाच धावांवर खेळत आहे.
पृथ्वी शॉची विकेट गेल्यानंतर पुजारा आणि मयंक अग्रवाल काळजीपूर्वक फलंदाजी करत आहेत. 12 ओवरनंतर टीम इंडियाची धावसंख्या 1 बाद 25 धावा अशी झाली आहे.
एडिलेड ओव्हल कसोटीत टीम इंडियाला पहिला धक्का बसला आहे. सामन्याच्या दुसर्याा बॉलवर स्टार्कच्या गोलंदाजीवर पृथ्वी शॉला बाद झाला. मयांक अग्रवालला पाठिंबा देण्यासाठी आता चेतेश्वर पुजारा मैदानात उतरला आहे.
पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियन गोलंदाजी भारतीय फलंदाजांवर हावी झालेली पाहायला मिळाली. डिनर ब्रेकपर्यंतच्या पहिल्या सत्रात टीम इंडियाची धावसंख्या 2 बाद 41 धावा अशी झाली आहे. पुजारा 17 तर विराट कोहली पाच धावांवर खेळत आहे.
एडिलेड ओव्हल कसोटीत टीम इंडियाने नाणेफेक जिंकली; कर्णधार विराट कोहलीचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

पार्श्वभूमी

India VS Australia : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Ind vs Aus) कसोटी (test) सामन्यांची सुरुवात गुरुवारपासून एडिलेड ओवल मैदानात डे- नाईट कसोटीनं होत आहे. भारतासाठी खेळाचं हे नवं स्वरुप अतिशय नवखं आहे, त्यामुळंच ऑस्ट्रेलियाचा संघ इथं अधिक भक्कम स्थानी दिसत आहे. डे- नाईट टेस्टबाबत सांगावं तर, या स्वरुपात ऑस्ट्रेलियाचा संघ सर्वात अनुभवी आहे. आतापर्य़ंत या संघानं 7 डे- नाईट कसोटी सामने खेळले आहेत. ज्यापैकी चार सामने एडिलेड ओवलमध्येच खेळले गेले आहेत. तर, भारतीय क्रिकेट संघानं मात्र आतापर्यंत अशा प्रकारचा एकच सामना खेळला आहे.


 


एडिलेडमध्ये भारतीय संघानं केलेलं प्रदर्शन पाहता ही संघासाठी जमेची बाजू ठरु शकते. 2018-2019 च्या दौऱ्यात भारतीय संघानं एडिलेडमध्ये विजयी प्रदर्शन केलं होतं. भारतीय संघानं दुसरा सराव सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंड येथे ‘पिंक बॉल’नं खेळला होता. या सामन्यात संघातील आघाडीचे खेळाडू कोहली, चेतेश्वर पुजारा, रविचंद्रन अश्विन, रिद्धिमान साहा आणि उमेश यादव सहभगी नव्हते. पण, या सर्वच खेळाडूंना एडिलेड टेस्टसाठी भारतीय संघातील अंतिम प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळालं आहे.


 


सलग तीन दिवस सातत्यानं रात्रीच्या वेळी सेंटर विकेटवर सराव केल्याचा आपल्या संघाला फायदाच होणार आहे, असं ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार टिम पेन यानं स्पष्ट केलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाकडून अंतिम प्लेइंग 11 ची निवड करण्यात आली असली, तरीही याची घोषणा मात्र अद्यापही करण्यात आलेली नाही. तर, भारतीय संघानं प्लेइंग 11 जाहीर केलं आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.