IND vs AUS : भारतीय लोक क्रिकेटवेडे समजले जातात. जगाच्या पाठीवर कुठेही क्रिकेटचा सामना खेळवला जावो, त्या ठिकाणी भारतीय क्रिकेटप्रेमी पोहचतात. तसेच जगातल्या अनेक देशांत मूळ भारतीय वंशाची लोकं वेगवेगळ्या कारणानिमित्त स्थायिक झालेले आहेत. त्या देशात भारताचा क्रिकेट सामना असेल तर संघाला पाठिंबा देण्यासाठी मूळ भारतीय वंशाच्या लोकांचा उत्साह ओसांडून वाहतो. असांच काहीसा प्रकार ऑस्ट्रेलियात पहायला मिळतोय.


विराट कोहलीची टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या पहिल्या वन डेच्या निमित्तानं आज पुन्हा मैदानात उतरली. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधील पहिली वन डे सिडनीच्या सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळवण्यात आली. या सामन्यानिमित्तानं दिसलेला मूळ भारतीय नागरिकांचा उत्साह पाहता ऑस्ट्रेलियात कोरोनाची नाही, तर क्रिकेटची लाट आल्याचं चित्र आहे.


शुक्रवार पासून सुरु झालेल्या टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील तीन एकदिवसीय सामने आणि तीन ट्वेंटी20 सामन्यांसाठी 50 टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेशाची परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु ही सारी तिकीटं हातोहात संपल्याचं पहायला मिळालं.


सिडनीतल्या पहिल्या एकदिवसीय सामन्याच्या निमित्तानं भारतीय प्रेक्षक वाजतगाजत स्टेडियमवर दाखल झाले. आजच्या सामन्यासाठी भारतीय प्रेक्षकांनी दाखवलेला उत्साह पाहण्यासारखा होता. त्यामुळं तब्बल आठ महिन्यांनी एका क्रिकेट स्टेडियमवर इंडिया.‌. इंडिया... हा नारा निनादला. लहानापासून ते वयोवृध्दापर्यंत सर्व प्रेक्षकांना काही काळ कोरोनाचा विसर पडल्याचं दिसून आलं.


सर्व जगाप्रमाणे ऑस्ट्रेलियालाही कोरानाचा फटका मोठ्या प्रमाणावर बसला आहे. त्यावर उपाय म्हणून ऑस्ट्रेलियाने कडक लॉकडाऊनच्या नियमांची अंमलबजावणी केली होती. त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी होती. अलिकडच्या काळात त्या नियमांत काही प्रमाणात शिथिलता आणण्यात आली आहे. त्यातच भारताचा ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं.


सुरुवातीपासूनच या सामन्यांना प्रेक्षकांना प्रवेश मिळणार की नाही याबाबत संभ्रम होता. पण ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डने 50 टक्के लोकांना प्रवेश देण्याचे जाहीर केलं. या निर्णयामुळं पाहता पाहता सामन्यांच्या तिकीटांची विक्री झाली. तब्बल आठ महिन्याने आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय प्रेक्षक ढोल ताशांच्या गजरात अगदी वाजत गाजत मैदानात पोहचत होते. अनेकांचा उत्साह भरभरुन वाहत होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियात कोरोनाची लाट आहे की नाही असाच अनेकांना प्रश्न पडला.


आजच्या सामन्याला मिळालेला प्रेक्षकांचा पाठिंबा पाहता ऑस्ट्रेलियात कोरोनाची नाही तर क्रिकेटची लाट असल्याचं दिसलं.


पहा व्हिडिओ: WEB EXCLUSIVE | ऑस्ट्रेलियात कोरोनाची नाही तर क्रिकेट लाट





महत्वाच्या बातम्या: