INDvsAUS : सिडनी येथे सुरु असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 375 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर कांगारूंचा संघ प्रथम फलंदाजीला आला. ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत सहा विकेट्स गमावून 374 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून अॅरॉन फिंच आणि स्टीव्ह स्मिथने शतकी खेळी खेळली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी लेगस्पिनर यजुवेंद्र चहल आणि वेगवान गोलंदाज नवदीप सैनी यांच्या विरोधात जोरदार फटकेबाजी केली.
चहलने मोडला स्वत: चा विक्रम
युजवेंद्र चहलने आजच्या सामन्यात 10 षटकांत 89 धावा दिल्या आणि मार्कस स्टॉयनिसची विकेट घेतली. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चहल हा भारतासाठी सर्वाधिक धावा देणारा स्पिनर ठरला आहे. याबाबतीत चहलने स्वत:चा विक्रम मोडला आहे. मागील वर्षी इंग्लंडविरुद्ध वर्ल्डकप 2019 मध्ये त्याने 10 षटकांत 88 धावा दिल्या होत्या. चहल नंतर या यादीमध्ये पियुष चावलाचे नाव आहे. पियुष चावलाने 2008 मध्ये पाकिस्तानविरुद्ध दहा षटकांत 85 धावा दिल्या होत्या. तर गेल्यावर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध चहलने एकही विकेट न घेता 10 षटकांत 80 धावा दिल्या होत्या.
आजच्या सामन्यात मोहम्मद शमी 10 षटकांत 59 धावा देणारा सर्वात किफायतशीर गोलंदाज ठरला. चहलने 10 षटकांत 89 रन देत एक विकेट घेतली. जसप्रीत बुमराहने 10 षटकांत 73 धावा देऊन एक विकेट घेतली. नवदीप सैनीनेही 10 षटकांत 8.3 च्या सरासरीने 83 धावा दिल्या आणि एक विकेट मिळवली.
IND vs AUS : भारताचे धडाकेबाज फलंदाज; ज्यांनी ऑस्ट्रेलिया विरोधात रचला धावांचा डोंगर
स्टीव्ह स्मिथची फटकेबाजी
ऑस्ट्रेलियाकडून अॅरोन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर यांनी पहिल्या विकेटसाठी 156 धावांची भागीदारी केली. वॉर्नर 69 धावांवर बाद झाला. यानंतर स्टीव्ह स्मिथ फलंदाजीला उतरला आणि भारतीय गोलंदाजांवर तुटून पडला. त्याने अवघ्या 62 चेंडूत शतक ठोकलं. स्टीव्ह स्मिथने 105 आणि फिंचने 114 धावा केल्या. याखेरीज ग्लेन मॅक्सवेल फक्त 19 चेंडूत 45 धावांची खेळी केली. भारताकडून मोहम्मद शमीने तीन गडी बाद केले. तर जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी आणि यजुवेंद्र चहल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलियातील पहिला वनडे सामना आज; स्टेडियमध्ये होणार प्रेक्षकांची एन्ट्री