IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला आजपासून सीडनीमध्ये सुरुवात होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये जेव्हाही वनडे सामन्यांबाबत बोललं जातं त्यानेळी शारजाहमधील सचिन तेंडुलकरचं शतक, वर्ल्ड कप 2003च्या फायनलमध्ये रिकी पॉन्टिगचं शतक आणि रोहित शर्माच्या दुहेरी शतकाच्या आठवणी ताज्या होतात. गेल्या एका दशकाबाबत बोलायचे झाले तर भारतीय संघाच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या विरोधात धावा केल्या आहेत. भारतीय कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी ऑस्ट्रेलिया संघाच्या विरोधात चक्क धावांचा पाऊस पाडला होता.


ऑस्ट्रेलियाच्या विरोधात सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज :



सचिन तेंडुलकर : 'क्रिकेटचा देव' भारताचे महान फलंदाज सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने 71 सामन्यांमध्ये 9 शतक ठोकत, 3077 धावा केल्या आहेत. सचिनने ऑस्ट्रेलियाविरोधात 9 शतक आणि 15 अर्धशतकं फटकावली आहेत. त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या संघात ग्लेन मॅक्ग्रा, ब्रेट ली, डेमियन फ्लेमिंग, जेसन गिलेस्पी यांसारखे वेगवान गोलंदाज आणि स्पिनर शेन वॉर्नसारखे दिग्गज गोलंदाज होते.



रोहित शर्मा : सध्याच्या काळातील एकदिवसीय सामन्यांतील सर्वात घातक सलामीचा फलंदाज रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाच्या संघाला अक्षरशः पाणी पाजतो. रोहितने केवळ 40 एकदिवसीय सामन्यांमध्ये कांगारुंच्या विरोधात 8 शतक ठोकत 2208 धावा तयार केल्या आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या विरोधात त्याने 209 धावांची खेळी केली होती. आजपासून सुरु होणाऱ्या वनडे सीरिजमध्ये रोहित शर्माचा संघात समावेश नाही. कदाचित याचा फायदा यजमान संघाला होऊ शकतो.



विराट कोहली : भारतीय कर्णधार विराट कोहलीही या रेकॉर्डमध्ये मागे नाही. कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाच्या विरोधात 38 सामन्यांमध्ये 1910 धावा केल्या आहेत. विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाच्या विरोधात 8 शतकं आणि तेवढीच अर्धशतकी खेळी केली आहे.



महेंद्र सिंह धोनी : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने सचिन तेंडुलकरनंतर ऑस्ट्रेलियाच्या विरोधात सर्वाधिक 55 सामने खेळले आहेत. कॅप्टन कूपने 55 सामन्यांमध्ये 11 वेळा नाबाद राहत 1600 धावा केल्या आहेत. धोनीने ऑस्ट्रेलिया संघाच्या विरोधात दोन शतकं आणि 11 अर्धशतकं केली आहेत.



शिखर धवन : भारतीय संघाचे ओपनर शिखर धवनने ऑस्ट्रेलियाच्या विरोधात 27 सामन्यांमध्ये 1145 धावा केल्या आहेत. त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या संघाविरोधात चार शतक आणि सहा अर्धशतकं फटकावली आहेत. गेल्या वर्षी वर्ल्डकपमध्ये धवनने ऑस्ट्रेलियाच्या विरोधात शकत ठोकलं होतं.


महत्त्वाच्या बातम्या : 


IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलियातील पहिला वनडे सामना आज; स्टेडियमध्ये होणार प्रेक्षकांची एन्ट्री