India vs Afghanistan 3rd T20I Match: मुंबई : टीम इंडिया (Team India) आणि अफगाणिस्तान (Afghanistan) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 सीरिजमधील (T20 Series) शेवटचा सामना आज खेळवण्यात येणार आहे. आजचा सामना बंगळुरूमधील (Bengaluru) के एम चिन्नास्वामी स्टेडियमवर (M. Chinnaswamy Stadium) खेळवण्यात येणार आहे. आजचा सामना भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. भारतीय क्रिकेट संघ (India National Cricket Team) याच वर्षी जूनमध्ये टी20 वर्ल्डकप (T20 World Cup) खेळणार आहे. यापूर्वी खेळवली जाणारी टीम इंडियाची ही शेवटची टी20 सीरिज असणार आहे. टीम इंडियानं अफगाणिस्तानविरोधातले दोन सामने जिंकून आधीच मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे टीम इंडियानं मालिका जिंकल्यातच जमा आहे. पण आजचा शेवटचा सामनाही टीम इंडियानं खिशात घातला तर मात्र अफगाणिस्तानला क्लिन स्विप देण्याची सुवर्णसंधी टीम इंडियाकडे आहे.  


टीम इंडिया-अफगाणिस्तानमधील ऐतिहासिक सीरिज 


टीम इंडिया विरोधात अफगाणिस्तानची ऐतिहासिक सीरिज आहे. दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत एकच आंतरराष्ट्रीय सीरिज खेळवण्यात आली आहे. 2018 मध्ये टीम इंडिया आणि अफगाणिस्तान यांच्यात टेस्ट सीरिज खेळवण्यात आली होती. तेव्हा द्विपक्षीय सीरिजमध्ये केवळ एकच टेस्ट मॅच खेळवण्यात आली होती. ज्यामध्ये भारतीय क्रिकेट संघानं 262 धावांनी अफगाणिस्तानचा धुव्वा उडवला होता. 


याव्यतिरिक्त टीम इंडिया आणि अफगाणिस्तान यांच्यात आतापर्यंत वनडे फॉर्मेटमध्ये एकही द्विपक्षीय सीरिज खेळवण्यात आलेली नाही. तर सध्या खेळवण्यात येत असलेली टी20 सीरिजही दोन्ही देशांमधील पहिली सीरिज आहे. अशातच अफगाणिस्तानही टीम इंडियाच्या विरोधात आपल्या पहिल्या टी20 सीरिजला क्लीन स्विपनं पराभूत करण्याच्या प्रयत्नात असेल. 






विश्वचषकापूर्वी टीम इंडियाचा शेवटचा 20 सामना


आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, अफगाणिस्तानविरोधातील मालिका टीम इंडियासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भारतीय क्रिकेट संघाला यावर्षी जूनमध्ये होणारा टी20 विश्वचषक खेळायचा आहे. यापूर्वी टीम इंडियाची ही शेवटची टी20 मालिका असणार आहे. अफगाणिस्तान मालिकेनंतर भारतीय क्रिकेट संघाला मायदेशात इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. यानंतर, मार्च ते मे दरम्यान, भारतीय खेळाडू इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 खेळण्यासाठी येतील. यानंतर टीम इंडिया थेट T20 विश्वचषकात प्रवेश करेल. ही आयसीसी स्पर्धा वेस्ट इंडिज आणि अमेरिका इथं खेळवली जाणार आहे.


अफगाणिस्तान विरुद्धच्या सीरिजसाठी दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन  


टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयसवाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, आवेश खान आणि मुकेश कुमार. 


टीम अफगानिस्तानी : इब्राहिम जादरान (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इकराम अलिखिल (विकेटकीपर), हजरतुल्लाह जजई, रहमत शाह, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, करीम जनत, अजमतुल्लाह उमरजई, शराफुद्दीन अशरफ, मुजीब-उर-रहमान, फजलहक फारूकी, फरीद अहमद, नवीन-उल-हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद और गुलबदीन नायब.