IND vs AFG 3rd T20I : भारत आणि अफगानिस्तान यांच्यातील अखेरचा तिसरा टी 20 सामना बेंगलोरमध्ये बुधवारी होणार आहे. भारतीय संघाने पहिल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवत मालिका खिशात घातली आहे. पण रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाला अखेरच्या टी 20 सामन्यात काही प्रश्नांची उत्तरे मिळवावी लागणार आहेत. टी 20 विश्वचषकाआधी भारताकडे ही अखेरची संधी असेल. कारण, भारतीय संघ पाच महिन्यानंतर टी 20 विश्वचषकात उतरेल. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या विश्वचषकाआधी भारतीय संघ अखेरचा आंतरराष्ट्रीय टी 20 सामना खेळणार आहे. त्याआधी भारतीय खेळाडू आयपीएलमध्ये खेळताना दिसतील. पण आंतरराष्ट्रीय टी 20 सामना अखेरचा असेल. 


विश्वचषकाआधी अखेरची संधी - 
 
भारतीय संघ टी 20 विश्वचषकाआधी आपली परफेक्ट प्लेईंग 11 तयार करण्यासाठी अखेरची संधी असेल. भारतीय संघाला आतापर्यंत योग्य ते कॉम्बिनेशन मिळालेले नाही. भारतीय संघात आतापर्यंत वेगवेगळ्या खेळाडूंना संधी दिली आहे. पण आगामी टी 20 विश्वचषकात भारतीय संघाची प्लेईंग 11 कशी असेल ? या प्रश्नाचं उत्तर अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे अफगाणिस्तानविरोधात भारतीय संघ आपली बेस्ट प्लेईंग 11 उतरवण्याची शक्यता आहे. रोहित शर्मा आणि कोच राहुल द्रविड अखेरच्या टी 20 सामन्यात कोणती प्लेईंग 11 उतरवणार ? याकडे क्रीडा विश्वाचं लक्ष लागलेय. 


बेंगलोरमध्ये होणार अखेरचा टी 20 सामना -


भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये बुधवारी तिसरा आणि अखेरचा टी 20 सामना (IND vs AFG 3rd T20)  होत आहे. बेंगलोरच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर (M. Chinnaswamy Stadium, Bangalore) दोन्ही संघ आमने-सामने असतील. पहिल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवून भारताने मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. अखेरचा सामना जिंकून भारत निर्वादित वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करेल. तर दुसरीकडे शेवट गोड करण्यासाठी अफगाण फौज मैदानात उतरेल. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. 


भारतीय संघात बदल होणार का ?


तिसऱ्या आणि अखेरच्या टी 20 सामन्यात टीम इंडियामध्ये महत्वाचे बदल होण्याची शक्यता आहे. भारताच्या प्लेईंग 11 मध्ये आवेश खान, कुलदीप यादव यांचा समावेश केला जाऊ शकतो. त्याशिवाय विकेटकिपर म्हणून संजू सॅमसन यालाही संधी मिळू शकते. दुसरीकडे मुकेश कुमार, वॉशिंगटन सुंदर आणि जितेश शर्मा यांना आराम दिला जाऊ शकतो. 



अखेरच्या टी 20 सामन्यासाठी भारताची संभाव्य प्लेईंग 11


रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायस्वाल, विराट कोहली, शिवम दुबे, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंह, अक्षर पटेल, वाशिंगटन सुंदर/कुलदीप यादव, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह आणि मुकेश कुमार/आवेश खान 


आणखी वाचा :


हार्दिक पांड्यासाठी धोक्याची घंटा, टीम इंडियातील कमबॅक झालं कठीण!


कुणाच्या जाण्यानं फरक नाही पडत, हार्दिकनं गुजरात सोडल्यानंतर शामी पहिल्यांदाच बोलला