IND vs NZ Head to Head Records: तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ न्यूझीलंड (India tour of New Zealand) दौऱ्यावर गेलाय. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी-20 सामना वेलिंग्टनच्या स्काय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार होता. परंतु, पावसामुळं हा सामना रद्द करण्यात आला. या मालिकेतील दुसरा सामना आज (20 नोव्हेंबर) माउंट मॉन्गनुई स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, दुपारी 12 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. तर, अर्ध्यातासापूर्वी नाणेफेक केलं जाईल. यापूर्वी भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्डवर एक नजर टाकुयात.


हेड टू हेड रेकार्ड
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत 21 टी-20 सामने खेळवले गेले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता भारताचं पारडं काहीसं जड राहिल्याचं दिसून आलं आहे. भारतानं 20 पैकी 11 सामन्यात विजय मिळवलाय. तर, इंग्लंड संघाला 9 सामन्यात विजय मिळवता आलाय. याशिवाय, एक सामना पावसामुळं रद्द झालाय.


रोहित शर्मा, विराट कोहलीसह वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती
या दौऱ्यात रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli), केएल राहुल (KL Rahul) यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आलीय. यामुळं न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत हार्दिक पांड्या (Hardik Pandya) भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. 


कधी, कुठं रंगणार सामना?
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी-20 सामना आज माउंट मॉन्गनुई क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, दुपारी 12 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. यापूर्वी अर्धातास नाणेफेक होईल. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील लाईव्ह सामना डीडी स्पोर्ट्सवर पाहता येईल.तसेच अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.


भारतीय संघ:
हार्दिक पांड्या (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), शुभमन गिल, ईशान किशन, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.


न्यूझीलंड संघ:
फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (विकेटकीपर), केन विल्यमसन (कर्णधार), ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टिम साऊदी, अॅडम मिल्ने, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर, मायकेल ब्रेसवेल, ईश सोढी.


हे देखील वाचा-