Hyderabad vs Manipur, Vijay Hazare Trophy 2022: विजय हजारे ट्रॉफीमध्ये हैदराबाद आणि मणिपूरचा (Hyderabad vs Manipur) यांच्यात आज (शनिवार, 18 नोव्हेंबर) लढत झाली. या सामन्यात चमकदार कमगिरी करणाऱ्या हैदराबादच्या संघानं सात विकेट्सनं विजय नोंदवला. हैदराबादच्या विजयात तिलक वर्मानं (Tilak Varma) महत्वाची भूमिका बजावली होती. त्यानं 77 चेंडूत नाबाद 126 धावांची शतकीय खेळी केली. ज्यात 14 चौकार आणि सात षटकारांचा समावेश होता.


ट्वीट- 






 


एम शशांकच्या भेदक गोलंदाजीसमोर मणिपूरच्या फंलदाजांनी गुडघे टेकले
या सामन्यात प्रथम फलंदाजी करत मणिपूरच्या संघानं 50 षटकात 191 धावांची खेळी केली. मणिपूरकडून विकास सिंहनं 37 चेंडूचा सामना करत सर्वाधिक नाबाद 44 धावांची खेळी केली. ज्यात पाच चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. तर, रेक्स सिंहनं पाच चौकाराच्या मदतीनं 36 धावांची खेळी केली. नितेश देसाईनं 38 चेंडूत 20 धावा केल्या. किशन सिंगानं 39 चेंडूंचा सामना करत 26 धावांचं योगदान दिले. हैदराबादकडून एम शशांकनं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तिलक वर्मा आणि रोहित रायडूनं प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. याशिवाय. चिंतला रक्षा रेड्डीच्या खात्यात एक विकेट जमा झाली. 


तिलक वर्माची नाबाद 122 धावांची खेळी 
मणिपूरनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या हैदराबादच्या संघासाठी तिलक वर्मा पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला होता. हैदराबादची खराब सुरुवात त्यानं सांभाळली आणि संघाला विजय मिळवून दिला. तिलकनं अवघ्या 77 चेंडूत नाबाद 126 धावा केल्या. त्याच्या खेळीत 14 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता. तर, रोहितनं 51 चेंडूत 39 धावांची खेळी केली. ज्यात दोन षटकार आणि एका षटकाराचा समावेश होता. कर्णधार तन्मय अग्रवाल 8 धावा करून बाद झाला. 


हे देखील वाचा-