Jasprit Bumrah and Shreyas Iyer Return : भारतीय क्रिकेट संघातील (Team India) दोन स्टार खेळाडूंबाबत नवीन अपडेट समोर आली आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह (Jasprit Bumrah) आणि स्टार फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांच्या तब्येतीसंदर्भात ताजी माहिती समोर आली आहे. जसप्रित बुमराह आणि श्रेयस अय्यर लवकरच टीम इंडियामध्ये कमबॅक करण्याची शक्यता आहे. बुमराह आणि अय्यर संघात पुनरागमनाची जोरदार तयारी करत आहेत. बुमराह आणि अय्यर सध्या सरावावर अधिक भर देत आहे. दोघेही सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये प्रॅक्टीस करत असून हळूहळू वर्कलोड वाढवताना दिसत आहेत.
जसप्रित बुमराह आणि श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट
टीम इंडियाचा दमदार फलंदाज श्रेयस अय्यर आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आशिया कप आधी टीम इंडियात 'कमबॅक' करण्याची शक्यता आहे. दोन्ही खेळाडू लवकरच पूर्णपणे तंदुरुस्त होऊन भारतीय संघात पुनरागमन करतील. श्रेयस अय्यर आणि जसप्रीत बुमराह पूर्णपणे फीट होण्याच्या मार्गावर आहेत. हे दोन्ही खेळाडू पुढील महिन्यात आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या मालिकेत टीम इंडियाचा भाग होऊ शकतात.
आशिया कप आधी टीम इंडियात 'कमबॅक'?
‘इंडियन एक्सप्रेस’च्या रिपोर्टनुसार, जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर हे दोन्ही खेळाडू आयर्लंड मालिकेत टीम इंडियाचा भाग होऊ शकतात. बुमराह आणि श्रेयस अय्यर दुखापतीमुळे मागील काही काळ टीम इंडियातून बाहेर आहेत. बुमराह पाठदुखीमुळे ग्रस्त होता, त्याच्यावर मार्च महिन्यामध्ये शस्त्रक्रिया पार पडली. तर श्रेयस अय्यरलाही पाठीच्या दुखण्यामुळे शस्रक्रिया करावी लागली होती. यामुळे तो आयपीएल आणि वर्ल्ड चॅम्पियनशीप फायनलला मुकला होता.
बुमराहचा गोलंदाजीच्या सरावावर भर
बुमराह आणि अय्यर सध्या तब्येतीकडे विशेष लक्ष देत असून सरावावर भर देत आहे. बुमराहने गेल्या महिन्यापासून गोलंदाजी करण्यास सुरुवात केल्याची माहिती आहे. बुमराह नेटमध्ये पूर्ण ताकदीने गोलंदाजी करत आहे. बुमराहला आशिया कपमधील टीम इंडियाचा भाग बनवण्याची भारतीय संघ व्यवस्थापन आणि सिलेक्टर यांची इच्छा आहे. त्यामुळेच तो पुढील महिन्यात होणाऱ्या आयर्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी रवाना होऊ शकतो. बुमराह आयर्लंड दौऱ्यावर जाणार की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
अय्यरकडून नेट प्रक्टिसला सुरुवात
याशिवाय, श्रेयस अय्यरनेही नेटमध्ये फलंदाजीचा सराव सुरू केला आहे. बुमराहसोबत अय्यरही पुढील महिन्यात आयर्लंड दौऱ्यासाठी रवाना होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे दोघेही तंदुरुस्त झाल्यास आशिया कप आधी टीम इंडियात सामील होऊ शकतात. आता याबाबत संघ व्यवस्थापन काय निर्णय घेते हे पाहावं लागणार आहे.