India Squad Announced For Australia ODI Series : ऑस्ट्रेलियाविरोधात बॉर्डर-गावस्कर मालिका सुरु आहे. या मालिकेनंतर तीन सामन्याची एकदिवसीय मालिका होणार आहे. एकदिवसीय मालिकेसाठी आज बीसीसीआयने टीम इंडियाची निवड केली आहे. पहिल्या सामन्यासाठी रोहित शर्मा उपलब्ध नाही. त्यामुळे संघाची धुरा युवा हार्दिक पांड्या याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. अखेरच्या दोन सामन्यासाठी रोहित शर्मा कर्णधार असेल. संघात केएल राहुल, विराट कोहली यासारख्या दिग्गजांचा समावेश आहे.
दुखापतीनंतर रविंद्र जाडेजानं एकदिवसीय संघात पुनरागमन झालेय. त्याशिवाय 10 वर्षानंतर जयदेव उनादकटला संधी देण्यात आली आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी रोहित शर्मा उपलब्ध नसणार आहे. त्यामुळे संघाची धुरा हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आली आहे.
भारतीय संघानं या वर्षी आतापर्यंत दोन एकदिवसीय मालिका खेळल्या आहेत. यामध्ये श्रीलंका आणि न्यूझीलंड या संघाचा समावेश आहे. दोन्ही मालिाक भारताने जिंकल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरोधात होणाऱ्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी कर्णधार रोहित शर्मा उपलब्ध नसेल. अखेरच्या दोन सामन्यासाठी तो भारतीय संघासोबत असणार आहे. शुभमन गिल, श्रेयस अय्यर यांनाही संधी देण्यात आली आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिका पांड्यासिवाय रविद्र जाडेजा, वॉशिंगटन सुंदर, अक्षर पटेल आणि शार्दुल ठाकूर यांचा समावेश आहे.
वनडे मालिकेसाठी जाडेजा आणि सुंदरशिवाय कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि युजवेंद्र चहल यांना संधी देण्यात आली आहे. वेगवान गोलंदाजामध्ये मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक आणि जयदेव उनादकट यांचा समावेश आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 17 मार्चपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे.
वनडे मालिकेसाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उप कर्णधार), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वाशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल, जयदेव उनादकट.
ऑस्ट्रेलिया-भारत यांच्यातील एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला एकदिवसीय सामना | 17 मार्च 2023 | मुंबई |
दुसरा एकदिवसीय सामना | 19 मार्च 2023 | विशाखापट्टम |
तिसरा एकदिवसीय सामना | 22 मार्च 2023 | चेन्नई |
आणखी वाचा :
अखेरच्या दोन कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची निवड, कुणाला मिळाली संधी?