India Squad Announced : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (BCCI) बॉर्डर-गावस्कर मालिकेतील अखेरच्या दोन कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची निवड केली आहे. नागपूर आणि दिल्ली येथे झालेल्या कसोटी सामन्यात भारताने बाजी मारली आहे. चार सामन्याच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ सध्या 2-0 ने आघाडीवर आहेत. आता तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यासाठी बीसीसीआयने आज टीम इंडियाची निवड केली आहे.
बीसीसीआयने अखेरच्या दोन कसोटी सामन्यासाठी पहिल्या दोन सामन्यातील संघच कायम ठेवला आहे. संघात कोणताही बदल केला नाही. खराब फॉर्ममध्ये असणाऱ्या केएल राहुल याला पुन्हा संधी देण्यात आली आहे. त्याशिवाय ईशान किशनही संघाचा भाग आहे.
अखेरच्या दोन सामन्यासाठी कोण कोण संघात?
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर , सूर्यकुमार यादव, उमेश यादव आणि जयदेव उनादकट.
त्याशिवाय बीसीसीआयने ऑस्ट्रेलियाविरोधात तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघाची निवड केली आहे. रविंद्र जाडेजानं एकदिवसीय संघात पुनरागमन केलेय. त्याशिवाय 10 वर्षानंतर जयदेव उनादकटला संधी देण्यात आली आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी रोहित शर्मा उपलब्ध नसणार आहे. त्यामुळे संघाची धुरा हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आली आहे.
वनडे मालिकेसाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकप्तान), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वाशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल, जयदेव उनादकट.
ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक (2023)
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला कसोटी सामना | 9-13 फेब्रुवारी 2023 | नागपूर |
दुसरा कसोटी सामना | 17-21 फेब्रुवारी 2023 | दिल्ली |
तिसरा कसोटी सामना | 1-5 मार्च 2023 | धर्माशाला |
चौथा कसोटी सामना | 9-13 मार्च 2023 | अहमदाबाद |
पहिला एकदिवसीय सामना | 17 मार्च 2023 | मुंबई |
दुसरा एकदिवसीय सामना | 19 मार्च 2023 | विशाखापट्टम |
तिसरा एकदिवसीय सामना | 22 मार्च 2023 | चेन्नई |
आणखी वाचा :