Boxing Day Test : बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा (SA vs IND ) दारुण पराभव केलाय. टेम्बा बवुमाच्या दक्षिण आफ्रिका संघाने भारताचा (IND vs SA) एक डाव आणि 32 धावांनी पराभव केला. भारताने पहिल्या डावात 245 धावा केल्या होत्या. तर आफ्रिकेने 408 धावा करत मोठी आघाडी घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजी पुन्हा ढेपाळली. भारताचा संपूर्ण डाव फक्त 131 धावांत संपुष्टात आलाय. भारताकडून एकट्या विराट कोहलीले झुंज दिली. विराट कोहलीने 76 धावांची खेळी केली. कोहलीचा अपवाद वगळता एकाही फलंजाला मोठी खेळी करता आली नाही. शुभमन गिल याने 26 धावा जोडल्या. पण इतर एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा पार करता आला नाही. 


यशस्वी जायस्वाल, रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, केएल राहुल, आर अश्विन आणि शार्दूल ठाकूर यांना दुहेरी धावसंख्याही पार करता आली नाही. विराट कोहली आणि शुभमन गिल यांची भागिदारी सोडली, तर एकही मोठी भागिदारी होऊ शकली नाही. आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना कोणताही संधी दिली नाही. ठराविक अंतराने भारताच्या विकेट गेल्या. त्यामुळे आफ्रिकेने भारताला दुसऱ्या डावात फक्त 131 धावांत संपुष्टात आला. दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर डीन एल्गरला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. डीन एल्गरने 185 धावांची उत्कृष्ट खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 28 चौकार मारले.


बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसऱ्या डावातही भारतीय फलंदाजांचा फ्लॉप शो कायम राहिला. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा एकही धाव न करता तंबूत परतला. यशस्वी जायस्वाल 5 धावा करून पॅव्हेलियनमध्ये गेला. यानंतर शुभमन गिल 26 धावा करून बाद झाला. विराट कोहलीने 76 धावांची खेळी खेळली असली तरी उर्वरित फलंदाजांनी निराशा केली. श्रेयस अय्यर आणि केएल राहुलने अनुक्रमे 6 आणि 4 धावा केल्या. रवी अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी अनुक्रमे 0, 2 आणि 0 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून एन बर्गर याने सर्वाधिक विकेट घेतल्या. बर्गर याने भारताच्या चार फलंदाजांना तंबूत धाडले. तर मार्को यानसन याने तीन विकेट घेतल्या. कहिसा रबाडाने दोन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. बॉक्सिंग डे कसोटीत भारताचा मोठा पराभव झालाय, दोन्ही डावात भारताची फलंदाजी फेल ठरली आहे.  


पहिल्या डावात आफ्रिकेची  163 धावांची आघाडी


दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 408 धावांवर आटोपला.  दक्षिण आफ्रिकेने 163 धावांची आघाडी घेतली. यजमान संघाकडून डीन एल्गरने सर्वाधिक 185 धावा केल्या. याशिवाय मार्को जानसेन 84 धावा करून नाबाद माघारी परतला. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 4 बळी घेतले. मोहम्मद सिराजने 2 बळी घेतले. शार्दुल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा आणि रवी अश्विन यांना प्रत्येकी 1 यश मिळाले.