Rishabh Pant Hardik Pandya Record England vs India 3rd ODI Old Trafford, Manchester : ऋषभ पंतचं दमदार शतक आणि हार्दिक पांड्याची अर्धशतकी खेळीच्या बळावर भारताने इंग्लंडचा पाच विकेटने पराभव केला. ऋषभ पंतला सामनावीर तर हार्दिक पांड्याला मालिकावीर म्हणून घोषीत केले. मोक्याच्या क्षणी पांड्या आणि पंत यांनी भागिदारी करत भारतलाा अशक्यप्राय विजय मिळवून दिला. पांड्या आणि पंत यांच्या भागिदारीच्या बळावर भारताने तीन सामन्याची मालिका 2-1 ने जिंकली. ऋषभ पंतने नाबाद 125 तर हार्दिक पांड्याने 71 धावांची खेळी केली. 


ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्या यांनी पाचव्या विकेटसाठी 133 धावांची भागिदारी केली. इंग्लंडमध्ये पाचव्या विकेटसाठी सर्वात मोठी भागिदारीमध्ये पांड्या-पंत यांची जोडी चौथ्या क्रमांकावर आहे. एम. एस धोनी आणि सुरेश रैना जोडी पहिल्या क्रमांकावर आहे. 2011 मध्ये या दोघांनी 169 धावांची भागिदारी केली होती. याच दोघांनी 2014 मध्ये 144 धावांची भागिदारी केली होती. 
 
एकदिवसीय सामन्यात इंग्लंडमध्ये भारतासाठी पाचव्या विकेटसाठी सर्वात मोठ्या पाच भागिदाऱ्या - 
 169 - धोनी/रैना (2011)
144 - धोनी/रैना (2014)
141 - अजय जडेजा/आर सिंह (1999)
133 - हार्दिक/पंत (2022)


हार्दिक पांड्या (Hardik Pandya), ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) दमदार कामगिरीच्या जोरावर भारतानं निर्णायक सामन्यात इंग्लंडचा (England Vs India) पाच विकेट्सनं पराभव केला. या विजयासह भारतानं तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा 2-1 असा पराभव केला. या सामन्यात न्यूझीलंडच्या संघानं दिलेल्या 260 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची दमछाक झाली. परंतु, हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंत यांच्या जोडीनं संघाचा डाव सावरून भारताच्या विजयाचा पाया रचला. भारताकडून ऋषभ पंतनं 113 चेंडूत नाबाद 125 धावांची खेळी केली. तर, हार्दिक पंड्यानं 55 चेंडूत 71 धावांचं योगदान दिलं. 


हे देखील वाचा-