Team India Squad For West Indies Series : दक्षिण आफ्रिका दौऱ्यात झालेला पराभव मागे टाकून भारतीय संघ नवी सुरुवात करण्यास सज्ज झाला आहे. रोहित शर्माने फिटनेस टेस्ट पास केली असून नेतृत्वासाठी सज्ज आहे. सहा फेब्रुवारीपासून होणाऱ्या वेस्ट इंडिजविरोधात एकदिवसीय आणि टी२० मालिका होणार आहे. वेस्ट इंडिजविरोधातील मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, युवा फिरकी गोलंदाज रवि बिश्नोईला टी२० संघात स्थान देण्यात आले आहे. 21 वर्षीय रवि बिश्नोई पहिल्यांदाज भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करत आहे. स्थानिक पातळीवर आणि आयपीएलमध्ये रवि बिश्नोईने दमदार कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिकामध्ये रवीचंद्रन अश्विन आणि यजुवेंद्र चहल यांनी निराशजनक कामगिरी केली होती. त्यामुळेच बीसीसीआयने युवा रवि बिश्नोईला संधी दिली आहे.
वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्याचं सुधारित वेळापत्रक
एकदिवसीय मालिका -
6 फ्रेबुवारी 2022 - अहमदाबाद
9 फेब्रुवारी 2022 - अहमदाबाद
12 फेब्रुवारी 2022 - अहमदाबाद
टी-20 मालिका
15 फ्रेब्रुवारी 2022 - कोलकाता
18 फेब्रुवारी 2022 - कोलकाता
20 फेब्रुवारी 2022 - कोलकाता
भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकामध्ये कसोटी मालिकेनंतर एकदिवसीय मालिकाही गमावली. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरुन परतल्यानंतर मायदेशात श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या संघाविरोधात टीम इंडिया दोन हात करणार आहे. भारतामध्ये वेस्ट इंडिज संघाविरोधात तीन सामन्याची एकदिवसीय आणि टी 20 मालिका होणार आहे. नुकतेच या मालिकेचं सुधारित वेळापत्रक बीसीसीआयने जारी केलं आहे. सहा फ्रेबुवारीपासून वेस्ट इंडिजविरोधात एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर वेस्ट इंडिजविरोधातील सामने दोन शहरात होणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडिअम अहमदाबाद आणि इडन गार्डन कोलकाता या मैदानावर एकदिवसीय आणि टी 20 मालिका होणार आहे. दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर न जाणाऱ्या रोहित शर्माचं या मालिकेद्वारे पुनरागमन होणार आहे.