India Vs Australia 1st T20 : पहिल्या टी20 सामन्यात भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलिया संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. विशाखापट्टणम येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आहेत. भारताकडून यशस्वी जायस्वाल आणि ऋतुराज गायकावड सलामीला उतरतील, तर इशान किशन, सूर्या आणि तिलक वर्मा मधली फळी संभाळतील. रिंकू सिंह आणि अक्षर पटेल यांच्यावर फिनिशिंगची जबाबदारी असेल. रवि बिश्नोई याच्यावर फिरकीची धुरा आहे. अर्शदीप, मुकेश कुमार आणि प्रसिध कृष्णा वेगवान गोलंदाजीचा भार संभाळतील. 


ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू शॉर्ट आणि स्मिथ सलामीला असतील. तर जोश इंग्लिश विकेटकिपर असेल. अॅरोन हार्डीन, मार्कस स्टॉयनिस, टीम डेविड आणि मॅथ्यू वेळ यांच्याके मधल्या फळीची जबाबदारी असेल. सीन एबॉट आणि तनवीर संघा फिरकीची धुरा पाहतील. नॅथन एलिस आणि जेसन बेहरनड्रॉफ वेगवान मारा संभाळतील. 


दोन्ही संघाची प्लेईंग 11 - 


ऑस्ट्रेलिया - स्टिव्ह स्मिथ, मॅथ्यू शॉर्ट, जोश इंग्लिश, अॅरोन हार्दाय, मार्कस स्टॉयनिस, टीम डेविड, मॅथ्यू वेड, सीन एबॉट, नॅथन इलिस, जेसन बेहरनड्रॉफ, तनवीर संघा


भारत - यशस्वी जायस्वाल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, तिलक वर्मा, रिंकू सिंह, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, अर्शधीप सिंह, मुकेश कुमार, प्रसिद्ध कृष्णा


Australia: 1 Steven Smith, 2 Matthew Short, 3 Josh Inglis (wk), 4 Aaron Hardie, 5 Marcus Stoinis, 6 Tim David, 7 Matthew Wade (capt), 8 Sean Abbott, 9 Nathan Ellis, 10 Jason Behrendorff, 11 Tanveer Sangha


India: 1 Yashasvi Jaiswal, 2 Ruturaj Gaikwad, 3 Suryakumar Yadav (capt), 4 Ishan Kishan (wk), 5 Tilak Varma, 6 Rinku Singh, 7 Axar Patel, 8 Ravi Bishnoi, 9 Arshdeep Singh, 10 Mukesh Kumar, 11 Prasidh Krishna


पाच सामन्याच्या मालिकेत भारतीय संघाची धुरा सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाची धुरा विकेटकीपर फलंदाज मॅथ्यू वेड याच्याकडे आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात होत असलेल्या पाच सामन्याच्या मालिकेसाठी भारतीय संघात बहुतांश युवा खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या तीन सामन्यांसाठी, भारतीय संघात फक्त दोनच खेळाडू असतील जे 2023 च्या विश्वचषकाचा भाग होते, ज्यात कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रसिध कृष्णा यांचा समावेश आहे. प्रसिध कृष्णाने विश्वचषकातील एकही सामना खेळला नाही. मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांमध्ये श्रेयस अय्यर संघात सामील होणार आहे. अय्यरकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.


पिच रिपोर्ट


विशाखापट्टणममधील राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी संतुलित आहे. या मैदानावर फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही सारखीच मदत मिळते.  त्यामुळे वेगवान गोलंदाज आणि फिरकी गोलंदाज दोघांनाही खेळपट्टीवर मदत आहे. त्याशिवाय या मैदानावर धावांचा पाठलाग करणे चांगले आहे, कारण दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाने 67 टक्के सामने जिंकले आहेत.