एक्स्प्लोर

India vs Pakistan : पाकिस्तान उद्धवस्त, भारत थेट प्वॉइंट्स टेबलच्या शिखरावर; एका विजयाने मोठी उलथापालथ

Asian Legends League 2026 Points Table : भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानवर मात करत आशियाई क्रिकेटमधील वर्चस्व कायम ठेवले आहे.

Asian Legends League 2026 Points Table : भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानवर मात करत आशियाई क्रिकेटमधील वर्चस्व कायम ठेवले आहे. रविवारी रात्री झालेल्या एशियन लिजेंड्स लीग 2026 स्पर्धेतील आठव्या सामन्यात इंडियन रॉयल्स संघाने पाकिस्तान पँथर्सचा थरारक लढतीत 2 विकेट्सने पराभव केला. या विजयामुळे भारताने केवळ सलग दुसरा विजय नोंदवला नाही, तर गुणतालिकेतही अव्वल स्थान पटकावले. दुसरीकडे पाकिस्तानच्या संघाला या पराभवामुळे मोठा फटका बसला असून तो स्पर्धेत अजूनही विजयाविना तळाला आहे.

पाकिस्तानने उभारले 167 धावांचे आव्हान

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान पँथर्सने 20 षटकांत 6 बाद 167 धावा केल्या. कर्णधार इमरान नझीर याने 29 चेंडूत 47 धावांची आक्रमक खेळी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्याच्या खेळीत 6 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. त्याला इबरार अट्टा आणि तौफीक उमर यांनी प्रत्येकी 39 धावांची महत्त्वपूर्ण साथ दिली. या तिघांच्या योगदानामुळे पाकिस्तानला स्पर्धात्मक धावसंख्या उभारता आली.

ऋषी धवनची अर्धशतकी खेळी, भारताचा थरारक विजय

168 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंडियन रॉयल्सला सुरुवातीलाच कर्णधार नमन ओझा अवघ्या 4 धावांवर बाद झाल्याने धक्का बसला. मात्र अभिषेक जलोटा (30 धावा, 19 चेंडू) आणि सरुल कंवर (46 धावा, 29 चेंडू) यांनी डाव सावरला. कंवरने 3 चौकार आणि 4 षटकारांसह आक्रमक फलंदाजी केली. सामन्याचा खरा हिरो ठरला ऋषी धवन. त्याने 33 चेंडूत 50 धावांची जबाबदारीची खेळी करत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. त्याच्या खेळीत 5 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता.

अखेरीस अनुरीत सिंग याने अवघ्या 6 चेंडूत नाबाद 16 धावा करत भारताचा विजय निश्चित केला. इंडियन रॉयल्सने 17.4 षटकांत 8 विकेट्स गमावत लक्ष्य गाठले आणि पाकिस्तानवर 2 विकेट्सने रोमांचक विजय मिळवला. पाकिस्तानकडून मोहम्मद इरफान, राहत अली आणि यासिर शाह यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या, मात्र त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले.

गुणतालिकेत भारत अव्वल, पाकिस्तान तळाशी

या विजयामुळे इंडियन रॉयल्सने एशियन लिजेंड्स लीग 2026 च्या गुणतालिकेत पहिले स्थान पटकावले आहे. भारताने आतापर्यंत खेळलेल्या दोन्ही सामन्यांत विजय मिळवत 100 टक्के यश कायम ठेवले आहे. दुसरीकडे पाकिस्तान पँथर्सची अवस्था बिकट झाली आहे. दोन सामन्यांनंतरही त्यांचे विजयाचे खाते उघडलेले नाही आणि सहा संघांच्या स्पर्धेत ते सहाव्या म्हणजेच अखेरच्या स्थानावर आहेत.

भारताचा पुढील सामना कधी?

इंडियन रॉयल्सने स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात 31 जुलै रोजी बांग्लादेश टायगर्सचा 19 धावांनी पराभव केला होता. त्यानंतर आता पाकिस्तानवरही मात करत संघाने विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. भारतीय संघाचा पुढील सामना श्रीलंकन लायन्सविरुद्ध 3 ऑगस्ट रोजी होणार आहे. सलग तिसरा विजय मिळवत अव्वल स्थान अधिक मजबूत करण्याचा भारताचा प्रयत्न असेल.

हे ही वाचा -

Abhishek Sharma : 25 षटकार, 15 चौकार, 91 चेंडूत 233 धावा; अभिषेक शर्माने इतिहास-भूगोल बदलला, पाहा हायव्होल्टेज खेळीचा VIDEO

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

India vs Pakistan : पाकिस्तान उद्धवस्त, भारत थेट प्वॉइंट्स टेबलच्या शिखरावर; एका विजयाने मोठी उलथापालथ
पाकिस्तान उद्धवस्त, भारत थेट प्वॉइंट्स टेबलच्या शिखरावर; एका विजयाने मोठी उलथापालथ
Dinesh Karthik Picks Team India Squad For ODI World Cup 2027: पंत, जडेजा, अर्शदीप OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी दिनेश कार्तिकने निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
पंत, जडेजा, अर्शदीप OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी दिनेश कार्तिकने निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
Abhishek Sharma : 25 षटकार, 15 चौकार, 91 चेंडूत 233 धावा; अभिषेक शर्माने इतिहास-भूगोल बदलला, पाहा हायव्होल्टेज खेळीचा VIDEO
25 षटकार, 15 चौकार, 91 चेंडूत 233 धावा; अभिषेक शर्माने इतिहास-भूगोल बदलला, पाहा हायव्होल्टेज खेळीचा VIDEO
IND vs SL 1st Test : 43 मॅच, 162 विकेट्स, 16 वेळा एका डावात 5 बळी...; श्रीलंकेत बुमराहच्या जागी येणारा 'हा' गोलंदाज नेमका आहे तरी कोण? आकडेवारी तर धडकी भरवणारी
43 मॅच, 162 विकेट्स, 16 वेळा एका डावात 5 बळी...; श्रीलंकेत बुमराहच्या जागी येणारा 'हा' गोलंदाज नेमका आहे तरी कोण? आकडेवारी तर धडकी भरवणारी
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pakistan Blast: पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
Bankipur By-election Prashant Kishor: देशातील सर्वाधिक हाय व्होल्टेज पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू; प्रशांत किशोर बाजी मारणार की भाजप गड राखणार?
देशातील सर्वाधिक हाय व्होल्टेज पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू; प्रशांत किशोर बाजी मारणार की भाजप गड राखणार?
Pune Crime News : ट्रिपल सीट दुचाकीचा धक्का लागला, 'गाडी नीट चालवता येत नाही का' म्हटल्यावरून संताप; पुण्याचा बाणेरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक
ट्रिपल सीट दुचाकीचा धक्का लागला, 'गाडी नीट चालवता येत नाही का' म्हटल्यावरून संताप; पुण्याचा बाणेरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक
IND vs SL 1st Test : 43 मॅच, 162 विकेट्स, 16 वेळा एका डावात 5 बळी...; श्रीलंकेत बुमराहच्या जागी येणारा 'हा' गोलंदाज नेमका आहे तरी कोण? आकडेवारी तर धडकी भरवणारी
43 मॅच, 162 विकेट्स, 16 वेळा एका डावात 5 बळी...; श्रीलंकेत बुमराहच्या जागी येणारा 'हा' गोलंदाज नेमका आहे तरी कोण? आकडेवारी तर धडकी भरवणारी
Abhishek Sharma : 25 षटकार, 15 चौकार, 91 चेंडूत 233 धावा; अभिषेक शर्माने इतिहास-भूगोल बदलला, पाहा हायव्होल्टेज खेळीचा VIDEO
25 षटकार, 15 चौकार, 91 चेंडूत 233 धावा; अभिषेक शर्माने इतिहास-भूगोल बदलला, पाहा हायव्होल्टेज खेळीचा VIDEO
Pankaja Munde and Dhananjay Munde: 'कंटाळा आलाय, रिटायर्ड व्हावंसं वाटतं...'; पंकजा अन् धनंजय मुंडेंचं राजकीय निवृत्तीबाबत महत्त्वाचं विधान, बीडच्या राजकारणात चाललंय तरी काय?
'कंटाळा आलाय, रिटायर्ड व्हावंसं वाटतं...'; पंकजा अन् धनंजय मुंडेंचं राजकीय निवृत्तीबाबत महत्त्वाचं विधान, बीडच्या राजकारणात चाललंय तरी काय?
WI vs PAK 2nd Test : पहिल्याच दिवशी पाकिस्तानची पळता भुई थोडी, वेस्ट इंडिजने मैदानात रडवून सोडलं, आता बाबरची पोरं शिकार करणार की शरण जाणार?
पहिल्याच दिवशी पाकिस्तानची पळता भुई थोडी, वेस्ट इंडिजने मैदानात रडवून सोडलं, आता बाबरची पोरं शिकार करणार की शरण जाणार?
Maharashtra Rain: महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरूच! साताऱ्याच्या कोयना-कृष्णा अन् वेण्णा नद्यांचा रौद्रावतार; छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला पाण्याचा वेढा, तर मुंबईतही जोर'धार'
महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरूच! साताऱ्याच्या कोयना-कृष्णा अन् वेण्णा नद्यांचा रौद्रावतार; छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला पाण्याचा वेढा, तर मुंबईतही जोर'धार'
Embed widget