LLC2 Final, India vs Bhilwara Kings : जागतिक क्रिकेटमधील माजी दिग्गज क्रिकेटर यांच्यात नुकताच लीजेंड्स लीग क्रिकेट (Legends League Cricket) स्पर्धेचा दुसरा हंगाम खेळवला गेला. अत्यंत रंगतदार होणाऱ्या या स्पर्धेचा अंतिम सामना 5 ऑक्टोबरला रात्री उशिराने पार पडला. सामन्याक गौतम गंभीरच्या नेतृत्त्वाखाली इंडिया कॅपिटल्सने इरफान पठाण कर्णधार असणाऱ्या गुजरात जायंट्स संघाला (India Capitals beat bhilwara kings) मात दिली. आधी फलंदाजी करणाऱ्या इंडिया कॅपिटल्सने 212 धावांचे आव्हान भिलवाडा किंग्ससमोर ठेवले होते. पण 107 धावांवर भिलवाडा किंग्जचा संपूर्ण संघ सर्वबाद झाला. ज्यामुळे कॅपिटल्सने 104 धावांच्या मोठ्या फरकाने सामना जिंकत इंडिया कॅपिटल्सने ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.






अंतिम सामन्यात सर्वात आधी नाणेफेक जिंकत भिलवाडा किंग्सचा कर्णधार इरफान पठाण याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर इंडिया कॅपिटल्सचा संघ फलंदाजीला मैदानात आला. पण कॅपिटल्सची सुरुवात अत्यंत खराब झाली. कर्णधार गंभीर 7, स्मिथ 3, मसाकजादा 1 आणि रामदिन 0 धावांवर बाद झाला. पण त्यानंतर न्यूझीलंडचा माजी दिग्गज क्रिकेटर रॉस टेलर आणि ऑस्ट्रेलियन लीजेंड मिचेल जॉन्सन यांनी तुफान फटकेबाजी करत संघाचा डाव सावरला. दोघांनी अनुक्रमे 82 आणि 62 धावा केल्या. तर ए नर्सने 42 धावांची खेळी केली. ज्यामुळे इंडिया कॅपिटल्सने 212 धावांचे आव्हान भिलवाडा किंग्ससमोर ठेवले. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या भिलवाडा संघाच्या खेळाडूंना खास कामगिरी करता आलीच नाही. त्यांच्याकडून शेन वॉटसन याने सर्वाधिक 27 धावा केल्या आणि 107 धावांवर संपूर्ण संघ सर्वबाद झाला. ज्यामुळे कॅपिटल्सने सामना 104 धावांनी जिंकला.


4 संघात पार पडली स्पर्धा


लीजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या सीजनमध्ये 4 संघानी सहभाग घेतला होता. इंडिया कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, भिलवाडा किंग्स आणि मणिपाल टायगर्स अशी या संघाची नावं असून ग्रुप स्टेजमध्ये हे चारही संघ प्रत्येकी 6-6 सामने खेळले. प्रत्येक दोन संघांमध्ये दोन सामने खेळवले गेले. ज्यानंतर इंडिया कॅपिटल्स आणि भिलवाडा किंग्स यांच्यात अंतिम सामना खेळवला गेला.


हे देखील वाचा-