Cricket World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषक यंदा भारतात होत आहे. पण या विश्वचषकाची खास बात म्हणजे, सर्व संघाचे कर्णधार नवीन असतील. 2019 च्या विश्वचषकातील एकही कर्णधार नसणार आहे. 2019 मध्ये विश्वचषकात नेतृत्व करणारे या विश्वचषकात खेळाडू म्हणून खेळणार आहेत. यामध्ये विराट कोहली याचा समावेश आहे. टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे. 


 2019 मध्ये कोणत्या संघाचे कोण कर्णधार - 


2019 मध्ये झालेल्या विश्वचषकात 10 संघाचा सहभाग होता. यामध्ये विश्वचषक विजेता कर्णधार इयॉन मॉर्गन याने निवृत्ती घेतली आहे. गेल्या विश्वचषकात संघाचे नेतृत्व करणारा एकमेव केन विल्यमसन होता. पण विल्यमसनला आयपीएलमध्ये दुखापत झाली आहे, त्याची दुखापत गंभीर असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे तो विश्वचषकात खेळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे यंदा सर्व दहा संघाचे कर्णधार नवीन असतील.. ते पहिल्यांदाच वर्ल्डकपमध्ये आपापल्या संघाचे नेतृत्व करणार आहेत. 


2019 विश्व कप मध्ये कोणत्या संघाचा कोण कर्णधार ?
इंग्लंड - इयॉन मॉर्गन
भारत- विराट कोहली. 
पाकिस्तान- सरफराज अहमद.
न्यूझीलंड- केन विल्यमसन.
दक्षिण अफ्रीका- फाफ डु प्लेसिस.
श्रीलंका- दिमुथ करुणारत्ने.
अफगानिस्तान- गुलबदीन नायब.
ऑस्ट्रेलिया- ऑरन फिंच. 
वेस्ट इंडीज- जेसन होल्डर.
बांगलादेश- मशरफे मुर्तजा.


यंदा भारतात होणाऱ्या विश्वचषकासाठी कोणत्या संघाचे कोण कर्णधार असू शकतात ?


भारत- रोहित शर्मा 2023 च्या विश्वचषकात भारताचे नेतृत्व करणार आहे.  
पाकिस्तान- बाबार आजम पाकिस्तानच्या संघाची धुरा सांभळणार आहे.   
न्यूझीलंड - दुखापतग्रस्त केन विल्यमसनच्या जागी टॉम लेथम न्यूझीलंड संघाची धुरा सांभाळेल.
दक्षिण अफ्रीका- टेम्बा बवुमा या विश्वचषकात कर्णधार असेल.  
श्रीलंका- जर श्रीलंका संघाने वर्ल्ड कप 2023 साठी क्वालिफाय केले तर दासुन शनाका नेतृत्व करेल.
अफगानिस्तान - हशमतुल्लाह शहीदी वर्ल्ड कप 2023 मध्ये धुरा सांभाळेल.  
ऑस्ट्रेलिया- पॅट कमिन्स वर्ल्ड कप 2023 मध्ये ऑस्ट्रेलिया संघाची धुरा सांभाळेल.
वेस्ट इंडीज- जरर विश्व कप 2023 साठी वेस्ट इंडिज संघ पात्र ठरा तर शाय होप नेतृत्व करेल. 
बांगलादेश- वर्ल्ड कप 2023 साठी तमीम इकबाल नेतृत्व सांभाळेल.