Womens Asia Cup T20 2022: महिला आशिया चषकातील आठव्या सामन्यात भारतीय महिला संघानं यूएईचा (India Women vs United Arab Emirates Women) 104 धावांनी विजय मिळवलाय. या स्पर्धेतील भारताचा हा सलग तिसरा विजय आहे. दरम्यान, जेमिमाह रॉड्रिग्स (Jemimah Rodrigues) , दीप्ती शर्मा (Deepti Sharma) यांच्या वादळी अर्धशतकांच्या जोरावर भारतानं यूएईसमोर 20 षटकांत 179 धावांचं लक्ष्य ठेवलं. या लक्ष्याचा पाठलाग करताना यूएईच्या संघाची दमछाक झाली. यूएईच्या संघाला 20 षटकात चार विकेट्स गामावून फक्त 74 धावांपर्यंत मजल मारता आली.
या सामन्यात भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय सलामीवीर सुभेनेनी मेघना आणि ऋचा घोष यांना काही खास कामगिरी करता आली नाही. सुभेनेनी मेघना 10 धावा तर, ऋचा घोष 1 धाव करून बाद झाली. दयालन हेमलताही 2 धावा करून स्वस्तात माघारी परतली. मात्र, त्यानंतर मैदानात आलेल्या दिप्ती शर्मा (49 चेंडूत 64 धावा) आणि जेमिमाह रॉड्रिग्सनं (45 चेंडूत 75 धावा) भारताचा डाव सावरला. जेमिमाह रॉड्रिग्स आणि दिप्ती शर्मा यांच्या व्यतिरिक्त भारतीय महिला संघातील कोणत्याही फलंदाजाला 15 धावांचा टप्पा गाठता आला नाही. भारतानं 20 षटकात 4 विकेट्स गमावून यूएईसमोर 20 षटकात 179 धावांचं लक्ष्य ठेवलं. यूएईकडून छाया मुघल, महिका गौर, ईशा रोहित ओझा आणि सुरक्षा कोट्टे यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली.
भारतानं दिलेल्या 179 लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या यूएईच्या संघाची खराब सुरुवात झाली. सलामीवीर तिर्था सतीश आणि इशा रोहित ओझा स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर कविशानं संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. तिनं या सामन्यात 54 चेंडूत नाबाद 30 धावांची खेळी केली. कविशानंतर फक्त खुशी शर्मानंच 29 धावांची खेळी केली. या सामन्यात यूएईच्या संघ विकेट्स वाचवले. परंतु, संथ खेळीमुळं निर्धारित 20 षटकांच्या सामन्यात यूएईला 104 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. भारताकडून राजेश्वरी गायकवाडला सर्वाधिक दोन विकेट्स मिळाल्या. तर, दयान हेमलताच्या खात्यात एक विकेट्स जमा झाली.
हे देखील वाचा-