IND vs SA, 3rd T20 Pitch report : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात सुरु तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा टी20 सामना इंदोरच्या होळकर क्रिकेट मैदानात खेळवला जाणार आहे. भारताने मालिकेतील पहिला सामना 8 विकेट्सने तर दुसरा 16 धावांनी जिंकत मालिकेत 2-0 ची विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आज भारताला दक्षिण आफ्रिकेला व्हाईट वॉश देण्याची संधी आहे. तर दक्षिण आफ्रिका किमान शेवटचा सामना जिंकण्यासाठी नक्कीच शर्थीचे प्रयत्न करेल. तर अशा स्थितीतनआजचा सामना होणाऱ्या मैदानाची स्थिती अर्थात पिच रिपोर्ट (Pitch Report) जाणून घेणं महत्त्वाचं आहे.


इंदोरच्या होळकर क्रिकेट मैदानाच्या खेळपट्टीचा विचार करता फलंदाजांसाठी हे अगदी नंदनवन आहे, याठिकाणी इतर मैदानांच्या तुलनेत छोट्या सीमारेषा असल्याने चौकार, षटकारांचा अगदी पाऊस पडू शकतो. आऊटफिल्ड फास्ट असल्याने फलंदाजांना धावा काढण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागत नसल्याने एक मोठी धावसंख्या उभी राहू शकते. ही खेळपट्टी जगातील सर्वात सपाट विकेट म्हणून ओळखली जाते. त्यामुळे गोलंदाजांना अधिक मेहनत घ्यावी लागते.


कसा आहे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका आजवरचा इतिहास?


भारत आणि दक्षिण आफ्रिका(India vs South Africa T20 Record) यांच्यात आतापंर्यंत 22 टी-20 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी 13 सामन्यात भारतानं विजय मिळवलाय. तर, दक्षिण आफ्रिका संघाला 8 सामने जिंकता आले आहेत. यातील एक सामना अनिर्णित देखील ठरला आहे. 


कशी असू शकते दोन्ही संघाची अंतिम 11


संभाव्य भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, दीपक चाहर


संभाव्य दक्षिण आफ्रिका संघ - टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, एनरिक नॉर्टजे, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, रिसोबा, रिसोबा रुसो, ट्रिस्टन स्टब्स.


हे देखील वाचा -