दाम्बुला : महिला आशिया कप  (Womens Asia Cup ) स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढतीत  भारत आणि बांगलादेश (IND W vs BAN W) आमने सामने आले आहेत. भारत विरुद्ध बांगलादेश आणि पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यात उपांत्य फेरीच्या लढती होत आहेत.  उपांत्य फेरीची पहिली लढत भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात सुरु आहे. बांगलादेशनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारताच्या गोलंदाजीपुढं बांगलादेशच्या फलंदाजांचा टिकाव लागला नाही. भारताच्या रेणुका सिंग, पूजा वस्त्राकर , डीबी शर्मा आणि राधा यादव यांनी बांगलादेशच्या फलंदाजांना बाद केलं. भारताकडून सर्वाधिक विकेट रेणुका सिंग आणि राधा यादवनं घेतल्या.  दोघींनी तीन-तीन विकेट घेतल्या. बांगलादेशनं 20 ओव्हरमध्ये 8 विकेटवर 80 धावा केल्या. भारताला विजयासाठी 81 धावांची गरज आहे.

  


भारतानं महिला आशिया कपमध्ये आतापर्यंत 7  वेळा विजेतेपद मिळवलं आहे. आजच्या मॅचमध्ये विजय मिळवत भारताचा अंतिम फेरीत प्रवेश करण्याचा प्रयत्न आहे. बांगलादेशनं पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांना मोठी धावसंख्या उभारण्यासाठी चांगली सुरुवात आवश्यक होती ती मात्र करता आली नाही. बांगलादेशला रेणुका सिंगनं धक्के दिले. रेणुका सिंगनं 3 विकेट घेतल्या. पूजा वस्त्राकरनं एक,  डीबी शर्मा हिनं एक विकेट घेतली. तर, राधा यादवनं 3 विकेट घेतल्या.


बांगलादेशच्या कॅप्टननं डाव सावरला


भारताच्या गोलंदाजांनी आक्रमक मारा केल्यानं बांगलादेश बॅकफूटवर असल्याचं पाहायला मिळालं. बागंलादेशची कॅप्टन निगर सुल्ताना आणि  शोर्ना अख्तर यांनी डाव सावरला. कॅप्टन निगर सुल्ताना 32 धावा करुन बाद झाली. अखेरच्या ओव्हरमध्ये मोठा फटका मरण्याच्या निगर सुल्ताना बाद झाली. 


भारताला विजयासाठी किती धावा कराव्या लागणार? 


भारतीय महिला संघाचा आशिया कप स्पर्धेत दबदबा राहिला आहे.  राधा यादवनं 20 व्या ओव्हरमध्ये एकही रन दिली नाही. तिनं शेवटच्या ओव्हरमध्ये 2 विकेट घेतल्या. बांगलादेशचा संघ 20 ओव्हरमध्ये 8  बाद 80 धावा करु शकला. भारतापुढं विजयासाठी 81  धावांची गरज आहे. आतापर्यंत भारतानं सातवेळा महिला आशिया कप जिंकला असून यंदा आठव्यांदा जिंकण्याची संधी आहे. 


हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांच्या नेतृत्त्वात भारतीय संघ आठव्यांदा महिला आशिया कप स्पर्धा जिंकू शकतो. भारतानं बांगलादेशला पराभूत केल्यास ते अंतिम फेरीत त्यांची लढत श्रीलंका आणि  पाकिस्तान यांच्यातील विजेत्या संघासोबत खेळावं लागणार आहे. 


महिला आशिया कपच्या अ गटातून भारतानं आणि पाकिस्ताननं उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. तर बांगलादेश आणि श्रीलंका यांनी गट ब मधून प्रवेश केला होता. 


संबंधित बातम्या :



आता फ्रान्समध्येही अंबानींचा बोलबाला, नीता अंबानींच्या खांद्यावर ऑलिम्पिकची मोठी जबाबदारी!