नवी दिल्ली : राहुल द्रविडनं (Rahul Dravdi) भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदावरुन पायउतार होण्याचा निर्णय वनडे वर्ल्ड कपनंतर घेतला होता. रोहित शर्माच्या विनंतीनुसार राहुल द्रविडनं टी 20 वर्ल्ड कप पर्यंत प्रशिक्षक म्हणून कार्यरत राहण्याचा निर्णय घेतला. राहुल द्रविडच्या मार्गदर्शनात रोहितसेनेनं टी 20 वर्ल्ड कप जिंकला. आयसीसी स्पर्धेत विजेतेपद मिळवणाऱ्या संघाचा मार्गदर्शक म्हणून राहुल द्रविडच्या भारतीय क्रिकेटमधील औपचारिक कारकिर्दीचा यशस्वी समारोप झाला. राहुल द्रविड भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून निवृत्त झाल्यानंतर अवघ्या एका महिन्यातच त्याचा मुलगा समित द्रविड (Samit Dravid) यानं लीग क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं आहे. कर्नाटकमधील महाराजा टी 20 क्रिकेट लीगमध्ये समित द्रविडला संधी मिळाली आहे.
आज बंगळुरुत झालेल्या महाराजा केएससीए टी 20 ट्राफीच्या ऑक्शनमध्ये राहुल द्रविडचा मुलगा समित द्रविड याला संधी मिळाली. समित द्रविडला म्हैसूर वॉरिअर्स संघानं करारबद्ध केलं. त्याच्या जीवनातील हा पहिलाच करार ठरला. म्हैसूर वॉरिअर्स गेल्या वर्षीच्या लीगमध्ये उपविजेती ठरली होती.
समित द्रविडचं वय 18 वर्ष असून त्याला म्हैसूर वॉरिअर्सनं करारबद्ध केलं आहे. मराराजा ट्रॉफी एएससीए टी 20 लीग 2024 मध्ये त्याला संधी देण्यात आली आहे. म्हैसूर वॉरिअर्सनं समितला 50 हजार रुपयांच्या रकमवेर करारबद्ध केलं आहे. समित द्रविड हा अष्टपैलू खेलाडू आहे. तो मधल्या फळीत फलंदाजी करतो तर वेगवान गोलंदाजी देखील करु शकतो. समित द्रविडनं अंडर 19 च्या कर्नाटकच्या टीममधून क्रिकेट खेळलं आहे. 2023-24 च्या कूच बिहार ट्रॉफीत देखील तो खेळला आहे. ती स्पर्धा कर्नाटक संघानं जिंकली होती. अलूरमध्ये लंकाशायर संघाविरुद्ध एएससीए इलेव्हन संघाचा समित द्रविड सदस्य होता.
म्हैसूर वॉरिअर्सचा कप्तान करुण नायर असेल. त्यानं भारतीय क्रिकेट संघाकडून कसोटी खेलेलली आहे. त्याच्या नावावर त्रिशतक देखील आहे. नायरनं यापूर्वीच्या हंगामात देखील म्हैसूर वॉरिअर्सचं नेतृत्त्व केलं होतं. कृष्णाप्पा गौतम याला 7.4 लाख रुपयांना तर जे सुचितला 4.8 लाख रुपयांना म्हैसूरनं खरेदी केलं आहे. तर, गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला 1 लाख रुपयांना खरेदी केलं आहे. गुलबर्गा मिस्टिक्सचा विकेटकीपर फंलदाज एलआर चेतनं सर्वात महागडा खेळाडू ठरला.
एलआर चेतनला 8.2 रुपयांना बंगळुरु ब्लास्टर्सनं करारबद्ध केलं. बंगळुरु ब्लास्टर्सचा कॅप्टन मयांक आग्रवाल आहे. त्याला टीमनं रिटेन केलं आहे. सूरज आहुजा, शुभांग हेगडे, मोहसिन खान देखील बंगळुरु ब्लास्टर्ससाठी खेळणार आहेत.
फिरकीपटू श्रेयस गोपालला मंगळुरु ड्रॅगन्सनं 7.6 लाख रुपयांना खरेदी केलं. तर, देवदत्त पडिक्कल गुलबर्गा संघाकडून खेलेल. महाराचा ट्रॉफी 15 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान बंगळुरुत एम चिन्नास्मावी स्टेडियममध्ये होणार आहे.
इतर बातम्या :