IND Vs WI, 3rd ODI : वेस्ट इंडिजचा कर्णधार शाय होप याने तिसऱ्या आणि खेरच्या वनडे सामन्यात नाणेफेक जिंकली आहे. भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. निर्णायक सामन्यातही रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना आराम देण्यात आला आहे. हार्दिक पांड्या नाणेफेकीसाठी मैदानात उतरला होता. भारतीय संघामध्ये दोन बदल करण्यात आले आहेत. त्याशिवाय वेस्ट इंडिजचा संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 


ऋतुराजला संधी - 


तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात भारतीय संघात दोन बदल करण्यात आले आहेत. मराठमोळ्या ऋतुराज गायकवाड याला प्लेईंग ११ मध्ये संधी देण्यात आली आहे. त्याशिवाय जयदेव उनादकट यालाही प्लेईंग ११ मध्ये स्थान देण्यात आलेय. अक्षर पटेल आणि उमरान मलिक यांना वगळण्यात आले आहे. ऋतुराज गायकवाड सलामीला खेळणार की तिसऱ्या क्रमांकावर? याबाबत प्रश्नचिन्ह आहे.



भारतीय संघाची प्लेइंग 11 : 


ईशान किशन, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जयदेव उनादकट, कुलदीप यादव, मुकेश कुमार


वेस्ट इंडिजच्या संघात कोण कोण ?


ब्रेंडन किंग, काइल मेयर्स, एलिक अथानाजे, शाई होप ( कर्णधार आणि विकेटकीपर), शिमरोन हेटमायर, कीसी कार्टी, रोमारियो शेफर्ड, यानिक कॅरियाह, अल्जारी जोसेफ, गुडाकेश मोती, जेडेन सील्स, केविन सिंक्लेयर, डोमिनिक ड्रेक्स, रोवमैन पॉवेल, ओशाने थॉमस. 


 






भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील अखेरचा एकदिवसीय सामना आज होणार आहे. त्रिनिदाद येथील ब्रायन लारा स्टेडिअमवर हा सामना होणार आहे. अखेरचा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरणार आहेत. मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. अखेरचा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरतील, यात शंका नाही. पहिला वनडे सामना भारतीय संघाने जिंकला होता, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवत वेस्ट इंडिजने पलटवार केला. आता तिसरा आणि निर्णायक सामना कोण जिंकणार ? याकडे क्रीडा चाहत्यांचे लक्ष्य लागलेय. 


कुठे पाहाणार सामना ?


भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) संघातील तिसरा वनडे सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सुरू होईल. हा सामना टीव्हीवर डीडी स्पोर्ट्सवर पाहता येईल. याव्यतिरिक्त सामना मोबाईलवर जिओ सिनेमा अॅपवर पाहता येऊ शकतो. एबीपी माझाच्या संकेतस्थाळवरही तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे.