IND vs WI 1st T20 : एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने वेस्ट इंडिजला व्हाईट वॉश दिला. तीन सामन्यांची मालिका 3-0 ने भारताने जिंकली. त्यानंतर आता टी20 मालिकेतही विजयी आघाडी घेण्याची संधी भारताला आहे. कारण भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिला टी20 सामना भारताने जिंकला. ज्यानंतर आता दुसरा सामना आज खेळवला जाणार आहे. पहिल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडीजला 6 विकेट्सनी मात दिली.


पहिल्या सामन्यात भारताचा युवा फिरीकपूट रवी बिश्नोईने संघात आगमन केलं. त्याने भारतीय संघातून पहिला सामना खेळला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर वेस्ट इंडीजच्या संघानं 20 षटकात 7 विकेट्स गमावून भारतासमोर 158 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात भारतानं 4 विकेट्स गमावून 18.5 षटकात 162 धावा केल्या. भारताकडून रोहित शर्मानं सर्वाधिक 40 धावा केल्या. तर गोलंदाजीत रवीनं उत्तम गोलंदाजी करत 2 विकेट्स घेतल्या. दरम्यान पहिला सामना जिंकल्यानंतर आता दुसरा सामना जिंकल्यास भारत मालिकेत 2-0 ची विजयी आघाडी घेईल. त्यामुळे एकदिवसीय सामन्यांची मालिका जिंकल्यानंतर टी20 सामन्यांची मालिकाही जिंकण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना 20 फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे.


कुठे खेळवला जाणार सामना?


हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स या क्रिकेट ग्राउंडवर खेळवण्यात येणार आहे.


कधी खेळवला जाणार सामना?


भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरा टी20 सामना आज अर्थात 18 फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना सायंकाळी 7 वाजता खेळवला जाणार आहे. 


टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ (India’s T20I squad) 


रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, ऋषभ पंत (उपकर्णधार/विकेटकिपर), वेंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकर, रवि बिश्नोई, यजुवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, ऋतुराज गायकवाड, दीपक हुड्डा, कुलदीप यादव


हे ही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha