IND vs WI T20 1st Innings Highlights : भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यातील पहिल्या टी20 सामन्यात भारताने एका मोठ्या विजयाची नोंद केली आहे. तब्बल 68 धावांनी विजय मिळवत भारत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. सामन्यात नाणेफेक जिंकत वेस्ट इंडीजने गोलंदाजी घेतली. ज्यानंतर भारताने कर्णधार रोहितचं अर्धशतक आणि अखेरच्या षटकांत दिनेश कार्तिकच्या फटकेबाजीने भारताचा डाव सावरत 190 धावा केल्या. त्यानंतर 191 धावा करण्यासाठी मैदानात आलेला वेस्ट इंडीजचा संघ 122 धावाच करु शकला. ज्यामुळे वेस्ट इंडीजचा संघ 68 धावांनी पराभूत झाला आहे.

  



सामन्यात नाणेफेक जिंकत वेस्ट इंडीजने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाला कमी धावांमध्ये रोखून नंतर निर्धारीत धावसंख्या पूर्ण करण्याची त्यांची रणनीती होती. त्यानुसार त्यांनी दमदार गोलंदाजीही केली. पण भारताचा कर्णधार रोहित शर्मा आज चांगल्या फॉर्ममध्ये होता. त्यामुळे एका बाजूने विकेट्स पडत असतानाही त्याने आपला खेळ कायम ठेवत दमदार असं अर्धशतक ठोकलं. त्याने 44 चेंडूत 64 धावा करत भारताचा डाव सावरला. पण तो बाद झाल्यावर भारताची धावसंख्या कमी होईल असं वाटत होतं. तेव्हाच अनुभवी दिनेश कार्तिकने तुफान फटकेबाजी करत 19 चेंडूत नाबाद 41 धावा कुटल्या आणि भारताची धावसंख्या 190 पर्यंत नेली. ज्यामुळे आता वेस्ट इंडीजला विजयासाठी 20 षटकात 191 धावा करायच्या होत्या. वेस्ट इंडीजकडून अल्झारी जोसेफने दोन तर ओबेद मकॉय, जेसन होल्डर, अकेल हुसेन आणि किमो पॉल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. 


भारताची भेदक गोलंदाजी


191 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या वेस्ट इंडीज संघाची सुरुवातच खराब झाली. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासून त्यांचे एक-एक गडी बाद केले. वेस्ट इंडीजकडून सर्वाधिक धावसंख्या ही शामराह ब्रूक्स याने केली ते देखील केवळ 20 धावा इतकीच होती. इतर कोणताही फलंदाज याहून अधिक धावसंख्या करु शकला नाही. भारताकडून फिरकीपटूंनी विशेष कामगिरी करत वेस्ट इंडीजचा निम्मा संघ तंबूत धाडला. यावेळी रवी बिश्नोई आणि आर. आश्विन यांनी प्रत्येकी दोन तर जाडेजाने एक विकेट घेतली. युवा अर्शदीपनेही दोन गडी बाद केले. तर भुवनेश्वरने एक विकेट घेतली. पण 41 धावांची दमदार खेळी करणारा दिनेश कार्तिक मालिकावीर ठरला.


हे देखील वाचा-