नवी दिल्ली : भारतानं (Team India) टी 20 वर्ल्ड कपच्या फायलनमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं. भारतानं टी 20 मध्ये विश्वविजेतेपद पटकावलं. दुसरीकडे श्रीलंकेचा संघ ग्रुप स्टेजमध्ये स्पर्धेतून बाहेर पडला. क्रिस सिल्वरवुड हे त्यावेळी श्रीलंकेचे (Sri Lanka) मुख्य प्रशिक्षक होते. टी 20 वर्ल्ड कपनंतर त्यांनी वैयक्तिक कारणांमुळं मुख्य प्रशिक्षक पद सोडलं होतं. एकीकडे भारतानं माजी सलामीवर आक्रमक फलंदाज गौतम गंभीरला मुख्य प्रशिक्षक पदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतलाय. दुसरीकडे श्रीलंकेनं देखील आक्रमक फलंदाज असलेल्या सनथ जयसूर्यावर (Sanath Jaysuriya) मोठी जबबादारी सोपवली आहे. श्रीलंकेचा मुख्य प्रशिक्षक म्हणून सनथ जयसूर्या काम पाहणार आहे.
सनथ जयसूर्याचा मुख्य प्रशिक्षक म्हणून श्रीलंकेसोबतचा प्रवास भारताविरुद्धच्या मालिकेपासून सुरु होणार आहे. श्रीलंकेत सध्या टी 20 लंका प्रीमियर लीग सुरु आहे. ही लीग 21 जुलै रोजी संपणार आहे. क्रिकेट श्रीलंकेच्या अपडेटनुसार सनथ जयसूर्या अंतरिम हेड कोच आहे. इंग्लंडच्या दौऱ्यापर्यंत तो श्रीलंकेच्या मुख्य प्रशिक्षक पदी असेल. श्रीलंका सप्टेंबरमध्ये इंग्लंडच्या दौऱ्यावर जाईल.
सनथ जयसूर्यानं एएफपी सोबत बोलताना म्हटलं की त्याला श्रीलंका क्रिकेट टीमचा हेड कोच होण्यासाठी सांगण्यात आलं आहे. टेस्ट आणि वनडे क्रिकेटमध्ये सनथ जयूसर्यानं श्रीलंकेचा कॅप्टन म्हणून काम केलं आहे. जयसूर्या यापूर्वी निवड समितीचा सदस्य देखील होता.
श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडून मुख्य प्रशिक्षक पदावर काम करण्याबाबत विचारणा झाल्याच्या वृत्ताला सनथ जयसूर्यानं दुजोरा दिला आहे. पुढच्या महिन्यात भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेपासून सनथ जयसूर्या मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करेल.
सनथ जयसूर्यानं श्रीलंकेकडून खेळताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 42 शतकं केली आहेत. तर, 440 विकेट देखील घेतल्या आहेत. एप्रिल 2022 मध्ये सिल्वरवुड यांनी श्रीलंकेच्या टीमचं मुख्य प्रशिक्षकपद स्वीकारलं होतं.
गौतम गंभीरच्या नावाची अधिकृत घोषणा कधी?
राहुल द्रविडचा मुख्य प्रशिक्षक म्हणून भारतीय संघासोबतचा प्रवास टी 20 वर्ल्ड कप सोबत संपला. राहुल द्रविडच्या मुख्य प्रशिक्षक पदाच्या कार्यकाळात भारतानं टी 20 वर्ल्ड कप जिंकला. गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षक पदावर नियुक्ती करण्यात येणार आहे.मात्र, गौतम गंभीरच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. माजी खेळाडू व्ही.व्ही.एस.लक्ष्मण भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून झिम्बॉब्वेच्या दौऱ्यावर गेले आहेत. यामुळं गौतम गंभीर देखील मुख्य प्रशिक्षक म्हणून त्याची कारकीर्द श्रीलंका दौऱ्यापासून सुरु करेल.
संबंधित बातम्या :