Virat Kohli-Anushka Sharma: टीम इंडियाच्या विजय परेडनंतर विराट कोहली (Virat Kohli) मुंबईहून थेट लंडनला गेला होता. विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि अकाय-वामिका लंडनमध्ये आहेत. मुलाच्या जन्मापासून अनुष्का तिथेच राहते. याचदरम्यान एक महत्वाची बातमी समोर आली आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा भारतसोडून कायमचे लंडनला शिफ्ट झाल्याचा दावा केला जात आहे. यासंबंधीच्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्या आहेत. मात्र या दाव्यावर अधिकृत कोणतेही वक्तव्य समोर आलेले नाही.


विराट कोहली आणि अनुष्काबाबत सोशल मीडियावर अनेक चर्चा सुरु आहेत. दोघेही लंडनला शिफ्ट झाल्याचा दावा एका पोस्टमध्ये करण्यात आला आहे. मात्र यावर विराट किंवा अनुष्काकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. टीम इंडियाने टी-20 विश्वचषक पटकावल्यानंतर विराट दिल्लीला आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर तो टीम इंडियासह मुंबईला रवाना झाले. मुंबईतील विजयी परेड झाल्यानंतर लगेच रात्री विराट कोहली लंडनसाठी रवाना झाला होता.


विराट-अनुष्काने लंडनमध्ये घर घेतले?


विराट कोहलीची खूप संपत्ती आहे. त्यांची दिल्ली आणि मुंबईत घरे आहेत. रिपोर्ट्सनुसार, कोहलीने अलीबागमध्ये नुकताच 10 कोटी रुपयांचा बंगला खरेदी केला होता. आता तो लंडनमध्ये असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.


कोहली-अनुष्का लंडनमध्ये घालवताय वेळ-


अनुष्का बऱ्याच दिवसांपासून लंडनमध्ये आहे. अकायच्या जन्माआधीच ती लंडनमध्ये गेली होती. अकायचा जन्म लंडनमध्येच झाल्याचा दावा केला जात आहे. अकायच्या जन्मामुळे टीम इंडियातून ब्रेक घेऊन कोहली लंडनला गेला होता. महत्त्वाची बाब म्हणजे अनुष्का गेल्या अनेक महिन्यांपासून लंडनमध्ये राहत आहे. 


विराटच्या वॉलपेपरवर नीम करोली बाबा?


विराट कोहली लंडनकडे रवाना होताना मुंबईच्या विमातनळावर तो दिसला. यावेळी पापाराझींनी त्याचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला. काही लोकांनी त्याचे व्हिडीओही काढण्याचा प्रयत्न केला. याच वेळी विराट कोहलीचा मोबाईल वॉलपेपरही कैद झाला. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये विराटच्या हातातील मोबाईलचा वॉलपेपर दिसतोय. हा फोटो बघून विराटच्या मोबाईल वॉलपेपरवर नीम करोली बाबा असल्याचा दावा केला जातोय. तशा प्रतिक्रियाही विराटच्या चाहत्याने केल्या आहेत. 


संबंधित बातम्या:


'टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी अन् WTC जिंकणार; जय शाह यांचं मोठं विधान


Ind vs Zim T20: 'अहंकाराला पायबंद बसला...'; टीम इंडियाचा झिम्बाब्वेविरुद्ध पराभव झाल्यानंतर शशी थरुर यांचं ट्विट


अत्यंत लाजिरवाणी, खराब फलंदाजी, काहीतरी चुकतंय…; झिम्बाब्वेविरुद्ध पराभव झाल्यानंतर शुभमन गिल संतापला