IND vs SL 1st T20I: भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील पहिल्या टी20 सामन्यात श्रीलंका संघाने (Sri Lanka Team) नाणेफेक जिंकत गोलंदाजी निवडली. त्यामुळे भारताला प्रथम फलंदाजी करावी लागली, ज्यानंतर भारताकडून ईशान-रोहितच्या (Ishan and Rohit) धमाकेदार फलंदाजीनंतर श्रेयसनेही अर्धशतक लगावल्यामुळे भारताने 199 धावा केल्या आहे. त्यामुळे श्रीलंकेला 200 धावा करायच्या आहेत.



भारत आणि श्रीलंका यांच्यात पार पडणारा हा पहिला टी20 (1st T20) सामना लखनौच्या भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी निवडली. ज्यामुळे फलंदाजीला भारताला आधी यावं लागलं आहे. भारताकडून ईशान आणि रोहित या दोघांनी सुरुवातीपासून फटकेबाजी सुरु केली. ईशानने 30 चेंडूत अर्धशतक झळकावलं. तर रोहित मात्र अर्धशतकाजवळ पोहचत 44 धावांवर बाद झाला. ज्यानंतर श्रेयस आणि ईशानने डाव सांभाळला. ईशानने 56 चेंडूत 89 धावा केल्या. त्याने 10 चौकार आणि 3 षटकार ठोकले. तर त्यानंतर श्रेयस अय्यर याने नाबाद 57 धावा लगावत धावसंख्या 199 पर्यंत पोहोचवली.


श्रीलंकेला 200 धावांची गरज


श्रीलंकेकडून कर्णधार शनाका आणि लाहिरु कुमारा यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली आहे. तर भारताने धमाकेदार फलंदाजीच्या जोरावार 199 धावा स्कोरबोर्डवर लावल्या आहेत. त्यामुळे ज्यामुळे आता विजयासाठी 200 धावांची गरज श्रीलंकेला आहे.


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha