Team India Celebration : डोळ्यात आनंदाश्रू, हातात विश्वचषक, खांद्यावर तिरंगा; विजयानंतर टीम इंडियाचा जल्लोष, पाहा टॉप 10 फोटो
अखेरच्या काही षटकांंत भारतीय गोलंदाजांनी थरारक खेळी करत भारताला विश्वचषक जिंकून दिला. या क्षणाची सर्व भारतीय वाट पाहत होते. या विजयानंतर टीम इंडियाच्या जल्लोषाचे क्षण कोट्यवधी भारतीयांसाठी अविस्मरणीय राहणार आहेत. (Image Source : PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकर्णधार रोहित शर्माने जेव्हा टी20 विश्वचषकाची ट्रॉफी उंचावली, तो क्षण प्रत्येक भारतीयाच्या मनात कायम राहिल. (Image Source : PTI)
विश्वचषकात विजय मिळवल्यावर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनने सर्वांचं लक्ष वेधलं. (Image Source : PTI)
रोहित आणि विराट भारतीय क्रिकेट संघाचे दोन आधारस्तंभ, या दोघांच्या खांद्यावर तिरंगा आणि हातात विश्वचषकाची ट्राफी हा क्षण पाहण्यासाठी कोट्यवधी भारतीयांचे डोळे आसुसलेले होते. (Image Source : PTI)
विजयानंतर विराट कोहली आणि रोहित शर्माने एकमेकांना मैदानातच कडकडून मिठी मारली. (Image Source : PTI)
रोहितने बार्बाडोसच्या मैदानावरील माती चाखून मैदानाला आदरांजली दिली.(Image Source : ICC)
विजयानंतर रोहित शर्माने बार्बाडोसच्या मैदानात भारताचा राष्ट्रध्वज फडकवला.(Image Source : PTI)
विश्वचषकाच्या संघात हार्दिक पांड्याच्या निवडीनंतर त्याच्यावर खूप टीका झाली, पण अखेरच्या सामन्यात त्याने संघाला विजय मिळवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. (Image Source : PTI)
अखेरच्या षटकाची जबाबदारी हार्दिक पांड्यावर होती. पांड्याने कॅप्टनचा विश्वास सार्थ ठरवला आणि टीम इंडियाला विजय मिळवून ट्रोलर्सला चपराक दिली. या विजयानंतर मात्र हार्दिक पांड्याने साचवून ठेवलेल्या अश्रूंचा बांध फुटला. यावेळी रोहितने त्याला कडकडून मिठी मारली.
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षणात भारताने टी20 वर्ल्डकप जिंकून त्यांंना विजयी निरोप दिला. या विश्वचषकासोबतच राहुल द्रविड यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला आहे. (Image Source : PTI)