IND vs SL T20I: भारतीय संघ मायदेशात श्रीलंकाविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका आणि तितक्याच सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. येत्या 3 जानेवारीपासून भारत आणि श्रीलंका यांच्यात टी-20 मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेत हार्दिक पांड्या टी-20 संघाचं नेतृत्व करताना दिसेल. टीम इंडिया श्रीलंकाविरुद्ध भारतात 15वा आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळणार आहे. भारतानं आतापर्यंत श्रीलंकाविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 सामन्यात कोणाचं पारड जड ठरलं? यावर एक नजर टाकुयात.


टीम इडियानं मायदेशात श्रीलंकाविरुद्ध आतापर्यंत 14 टी-20 सामने खेळले आहेत. यातील भारतानं 11 सामने जिंकले आहेत. तर, अवघ्या दोन सामन्यात श्रीलंकाच्या संघाला विजय मिळवता आलाय. याशिवाय, एक सामना अनिर्णित ठरलाय. घरच्या मैदानावर भारताची श्रीलंकाविरुद्ध आतापर्यंतची कामगिरी उत्कृष्ट आहे. भारत आणि श्रीलंका आतापर्यंत एकूण 17 टी-20 सामन्यात आमने सामने आले. यातील 17 सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. तर, आठ सामन्यात पराभव स्वीकारावा लागलाय. यातील एक सामना अनिर्णित ठरलाय. भारत आणि श्रीलंका आशिया चषकात शेवटचे आमने सामने आले होते. या सामन्यात भारताला सहा  विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला होता. अशा स्थितीत भारतीय संघाला आशियाई चॅम्पियन श्रीलंकेला हलक्यात घेण महागात पडू शकतं. श्रीलंकेच्या संघात असे काही खेळाडू आहेत, ज्यांच्यात सामने बदलण्याची क्षमता आहे. 


कसं असेल श्रीलंकेचा भारत दौरा?
येत्या 3 जानेवारीपासून भारत आणि श्रीलंका यांच्यात टी-20 मालिका सुरू होणार आहे. हा सामना मुंबईत होणार आहे. त्यानंतर दुसरा आणि तिसरा टी-20 सामना अनुक्रमे 5 जानेवारीला पुण्यात आणि 7 जानेवारीला राजकोटमध्ये खेळवला जाईल. त्यानंतर लगेच 10 जानेवारीपासून एकदिवसीय मालिका सुरूवात होईल. पहिला एकदिवसीय सामना गुवाहाटी येथे होणार आहे. यानंतर मालिकेतील दुसरा सामना 12 जानेवारीला आणि तिसरा सामना 15 जानेवारीला होणार आहे.


श्रीलंकेचा टी-20 संघ:
दासुन शनाका (कर्णधार), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, चरिथ असालंका, धनंजया डी सिल्वा, वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, सदीरा समरविक्रमा, कुसल मेंडिस, भानुका राजपक्षे, अशेन बंडारा, महेश थेक्सान, प्रमोदनाथ वेल, डुक्कर राजपक्षे, दासुन बंधारा, डुक्कर, राजकुमार राजकुमार, डुक्कर, दुग्धशैली. मदुशन, लाहिरू कुमारा, नुवान तुषारा.


भारताचा टी-20 संघ:
हार्दिक पंड्या (कर्णधार), रुतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम मावी, इशान किशन, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, उमरान मलिक, मुकेश कुमार.


हे देखील वाचा-