India World Cup Shortlist 20 Players Probable Names: भारतीय नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयनं (BCCI) या वर्षी भारतात खेळल्या जाणाऱ्या आगामी एकदिवसीय विश्वचषकासाठी 20 खेळाडूंना शॉर्टलिस्ट केलंय. रविवारी पार पडलेल्या बीसीसीआयच्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ज्यात 20 खेळाडूंना एकदिवसीय विश्वचषकासाठी शॉर्टलिस्ट करण्यात आलंय. या 20 क्रिकेटपटूंपैकी प्रत्येकाला रोटेशन पॉलिसी अंतर्गत संधी दिली जाईल. तब्बल 12 वर्षानंतर भारताला एकदिवसीय विश्वचषकाचं यजमानपद मिळालं आहे. दरम्यान, 2011 मध्ये भारताला एकदिवसीय विश्वचषकाचं यजमानपद मिळालं होतं. त्यावेळी भारताचा माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात भारतानं दुसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. तेव्हापासून भारताला आयसीसीची कोणतीही ट्रॉफी जिंकता आली नाही. 


क्रिकबझचं ट्वीट-




 


रोटेशन पॉलिसी अंतर्गत खेळाडूंना संधी मिळणार
बीसीसीआयनं आगामी एकदिवसीय विश्वचषकासाठी शॉर्टलिस्ट केलेल्या 20 खेळाडूंपैकी विश्वचषक संघ निवडला जाईल. या सर्व खेळाडूंना विश्वचषकापूर्वी खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय सामन्यांमध्ये रोटेशन धोरणानुसार संधी दिली जाणार आहे. यादरम्यान, ज्या खेळाडूची कामगिरी प्रभावी असेल,त्याची संघात निवड केली जाईल. भारताच्या एकदिवसीय विश्वचषकात रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि रवींद्र जाडेजा यांसारख्या खेळाडूंची नावे जवळपास निश्चित मानली जातायेत. मात्र, इतर खेळाडूंना भारताच्या विश्वचषक संघात स्थान मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. 


बीसीसीआयनं शॉर्टलिस्ट केलेल्या 20 संभावित खेळाडूंची यादी
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, शुभमन गिल/शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.


हे देखील वाचा-