कोलंबो : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेला शनिवारपासून सुरुवात होत आहे. भारतीय क्रिकेट संघ सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्त्वात श्रीलंकेत दाखल झाला आहे. भारतीय संघानं सराव देखील सुरु केला आहे. दुसरीकडे श्रीलंकेच्या अडचणी वाढत आहेत. श्रीलंकेचा स्टार खेळाडू वेगवान गोलंदाज नुवान तुषारा (Nuwan Thushara) जखमी झाल्यानं मालिकेबाहेर गेला आहे. तुषाराला सरावादरम्यान दुखापत झाली. 


भारतानं टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर शुभमन गिलच्या नेतृत्त्वात झिम्बॉब्वेचा दौरा केला होता. या दौऱ्यात भारतानं 4-1  असा विजय मिळवला होता. आता सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. टी 20 वर्ल्ड कपमधील अपयश पुसून टाकण्याच्या इराद्यानं श्रीलंकेनं सराव सुरु केला होता. मात्र, श्रीलंकेला सराव सत्रात मोठा धक्का बसला. वेगवान गोलंदाज  नुवान तुषारा याच्या बोटाला दुखापत झाली. त्यामुळं त्याला मालिकेबाहेर जावं लागलं. अजूनपर्यंत नुवान तुषाराच्या जागी नव्या खेळाडूची निवड करण्यात आलेली नाही. त्याच्या ऐवजी दिलशान मधुशंका याला संघात स्थान दिलं जाऊ शकतं.  


श्रीलंकेला 24  तासात दुसरा धक्का


नुवान तुषारा जखमी होण्यापूर्वी दुष्मंथा चमीरा देखील दुखापतीमुळं बाहेर गेला आहे. चमीरा  दुखापतग्रस्त झाल्यानंतर आता नुवान तुषारा देखील संघाबाहेर गेल्यानं श्रीलंकेचा संघ मोठ्या अडचणीत सापडला आहे. 


 श्रीलंकेचा संघ : 


चारिथ असलंका (कर्णधार), पथुम निसांका, कुसल झेनिथ परेरा, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, दिनेश चंडीमल, कामिंदू मेंडिस, दासुन शनाका, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेलेज, महेश वेलेज, चामिंडू विक्रमसिंघे, मथिशा पाथिराना, नुवान तुषारा(दुखापतीमुळं मालिकेबाहेर), दुष्मंथा चमीरा, (दुखापतीमुळं मालिकेबाहेर)आणि बिनुरा फर्नांडो.


भारताचा संघ : 


सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रायन पराग, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या , शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.


टी 20 मालिकेचं वेळापत्रक


27 जुलै - 1ली टी-20 (पल्लेकेले)


28 जुलै - दुसरी टी-20 (पल्लेकेले)


30 जुलै - तिसरी टी-20 (पल्लेकेले)


एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक


2 ऑगस्ट – पहिली वनडे (कोलंबो)


4 ऑगस्ट – दुसरी वनडे (कोलंबो)


7 ऑगस्ट – तिसरी एकदिवसीय (कोलंबो)


संबंधित बातम्या :



घटस्फोटानंतरही स्वत:ला रोखू शकला नाही; नताशाची पोस्ट अन् हार्दिक पांड्याची कमेंट, काय म्हणाला?