कोलंबो : आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा समाना असो किंवा एखाद्या गल्लीतला क्रिकेटचा खेळ, प्रत्येक खेळाडूला मी जास्तीत जास्त काळ मैदानात फलंदाजी करावी असेच वाटते. त्यासाठीच त्या फलंदाजाचा खटाटोप चालू असतो. अनेकदा बाद असूनही अनेक फलंदाज बाद नसल्याचा दावा करतात. प्रसंगी ते पंचाशीही भांडण करतात. भारत आणि श्रीलंका यांच्यात 2 ऑगस्ट रोजी झालेल्या एकदीवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात मात्र वेगळे चित्र दिसले. या सामन्यात श्रीलंकेच्या जनिथ लियानगे याने बाद नसूनदेखील मैदान सोडले. त्याच्या या कृतीमुळे क्रिकेटविश्वात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
लियानगेने सोडले मैदान
जनिथ लियानगेला बाद देण्यास सुरुवातीला पंचाने नकार दिला होता. भारतीय खेळाडूंनी लियानगे बाद असल्याचा दावा करून तशी अपील केली होती. मात्र पंचांनी दाबावाला बळी न बडता तो बाद नसल्यांची भूमिका घेतली होती. पण खुद्द लियानगे यानेच मैदान सोडल्यामुळे पंचालाही त्याला बाद म्हणून घोषित करावे लागले.
नेमकं काय घडलं?
सध्या भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन एकदिवसीय सामने खेळवले जात आहेत. याच तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामन 2 ऑगस्ट रोजी खेळवला गेला. या सामन्याच्या पहिल्या डावात श्रीलंकेने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवातीला जनिथ लियानगे हा उत्तम फलंजाजी करत होता. मात्र 35 व्या षटकात पंचाने बाद घोषित न करताच तो मैदानाबाहेर गेला. भारतीय कर्णधाराने अक्षर पटेलला 35 वे षटक टाकण्यास सांगितले. या षटकाचा दुसरा चेंडू त्याने फेकला. हा चेंडू लियानगेच्या बॅटच्या जवळून गेली. त्यानंतर हा चेंडू मागे यष्टीरक्षक असलेल्या के एल राहुलच्या पॅडला लागला आणि थेट स्लिपमध्ये उभ्या असलेल्या रोहित शर्माच्या हातात गेला. त्यानंतर रोहित शर्माने अपील केली तर गोलंदाज अक्षर पटेलनेही त्याला साथ दिली.
पंचाने बाद देण्यास दिला होता नकार
पंचाने सुरुवातीला रोहित आणि अक्षरच्या या अपीलाला दाद दिली नाही आणि लियानगे बाद नसल्याचे म्हटले. मात्र, पंचाच्या निर्णयाकडे लक्ष न देता जनिथ लायनगे थेट मैदानाच्या बाहेर गेला. लियानगेच्या या निर्णयानंतर पंचालाही वाटलं की लियानगे बाद असावा. म्हणूनच पंचानेदेखील लियानगे बाद असल्याचे जाहीर केले.
...म्हणून लियानगेने मैदान सोडले
श्रीलंकेचा नवा खेळाडू मैदानात आल्यानंतर ब्रॉडकास्टर्सने लियानगे बाद झालेला चेंडू परत दाखवला. त्यानंतर खरा प्रकार समोर आला. लियानगेच्या बॅटचा आणि चेंडूचा स्पर्श झालेला नव्हता. म्हणजेच लियानगे झेलबाद नव्हता. अल्ट्राएज तंत्रज्ञानाच्या मदतीने हे स्पष्ट झाले होते. लियानगेची बॅट जमिनीवर घासली होती. ज्यामुळे एक आवाज झाला होता. हाच आवाज गृहित धरून चेंडू आणि बॅटचा एकमेकांशी संपर्क झाला असावा असे लियानगेला वाटले आणि त्याने मैदान सोडले. दरम्यान या सामन्यात कोणालाही विजय मिळाला नाही. हा सामना बरोबरीत संपला.
हेही वाचा :