India vs Sri Lanka In Asia Cup Final : आशिया चषका 2023 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी होणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडिअमवर लढत होणार आहे. ३० ऑगस्टपासून सुरु असणाऱ्या स्पर्धेचा विजेता रविवारी मिळणार आहे. अंतिम सामन्यावर पावसाचे सावट आहे. पण दिलासादायक बाब म्हणजे, फायनलसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. सुपर ४ फेरीत श्रीलंकेला हरवत भारताने फायनलमध्ये प्रवेश केला होता. फायनलचे तिकिट मिळवणारा भारत पहिला संघ ठरला होता. पाकिस्तानचा पराभव करत श्रीलंका संघाने फायनलमध्ये प्रवेश केला होता. आता रविवारी आशिया चषकाचा किंग कोण? यावरुन पडदा उठणार आहे. पण भारत आणि श्रीलंका आशिया चषकाच्या फायनलमध्ये आठव्यांदा आमनेसामने आलेत. याआधी या दोन संघामध्ये सातवेळा स्पर्धा रंगली होती.  


रविवारी आशिया चषकाचा किंग कोण? यावरुन पडदा उठणार आहे. पण भारत आणि श्रीलंका आशिया चषकाच्या फायनलमध्ये आठव्यांदा आमनेसामने आलेत. याआधी या दोन संघामध्ये सातवेळा स्पर्धा रंगली होती.  रविवारी भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये फायनलचा सामना रंगणार आहे. या सामन्यात टीम इंडियामध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह गोलंदाजीची धुरा सांभाळतील.. विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांचे कमबॅक होईल. बांगलादेशविरोधात झालेल्या सामन्यात टीम इंडियात पाच बदल करण्यात आले होते. विराटसह अनेकांना आराम दिला होता. 
अंतिम फेरीसाठी विश्रांती देण्यात आलेल्या सर्व खेळाडूंचे पुनरागमन निश्चित आहे. या खेळाडूंमध्ये विराट कोहली, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि हार्दिक पांड्यासारख्या स्टार खेळाडूंचा समावेश होता. श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यासाठी सर्व खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये परत येतील. भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना कधी अन् कुठे होणार, याबाबत जाणून घेऊय़ात..


कधी आणि कुठे रंगणार सामना ?


टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यातील अंतिम सामना दुपारी 3 वाजता सुरू होईल.  दुपारी अडीच वाजता नाणेफेक होणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडिअमवर होणार आहे.  


टिव्हीवर फ्रीमध्ये कुठे पाहाल सामना - 



भारत आणि श्रीलंका यांच्यातील सुपर ४ मधील सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह प्रसारित करण्यात येत आहे. त्याशिवाय डीडी स्पोर्ट्स चॅनलवर मोफत प्रेक्षपण होत आहे. 


मोबाईलवर कुठे पाहाल... ?


भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना डिज्नी प्लस हॉटस्टार या अॅपवर फ्रीमध्ये पाहता येईल.  


आशिया चषकासाठी टीम इंडियाचे शिलेदार -   


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ईशान किशन, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकुर, प्रसिद्ध कृष्णा, तिलक वर्मा. 
 
टीम इंडिया श्रीलंका यांच्यात फायनल -  - 


आशिया चषक 2023 च्या (Asia Cup 2023) सुपर-4 च्या महत्त्वाच्या सामन्यात श्रीलंकेनं (Sri Lanka) पाकिस्तानचा (Pakistan) 2 गडी राखून पराभव करत अंतिम फेरीतील आपलं स्थान पक्कं केलं. त्यामुळे आशिया चषक 2023 च्या अंतिम सामन्यात टीम इंडिया आणि श्रीलंकेमध्ये लढत होणार आहे. भारताने श्रीलंकेचा पराभव करत फायनलचे तिकिट मिळवले होते.