India vs Sri Lanka In Asia Cup Final : आशिया चषका 2023 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी होणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडिअमवर लढत होणार आहे. ३० ऑगस्टपासून सुरु असणाऱ्या स्पर्धेचा विजेता रविवारी मिळणार आहे. अंतिम सामन्यावर पावसाचे सावट आहे. पण दिलासादायक बाब म्हणजे, फायनलसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. सुपर ४ फेरीत श्रीलंकेला हरवत भारताने फायनलमध्ये प्रवेश केला होता. फायनलचे तिकिट मिळवणारा भारत पहिला संघ ठरला होता. पाकिस्तानचा पराभव करत श्रीलंका संघाने फायनलमध्ये प्रवेश केला होता. आता रविवारी आशिया चषकाचा किंग कोण? यावरुन पडदा उठणार आहे. पण भारत आणि श्रीलंका आशिया चषकाच्या फायनलमध्ये आठव्यांदा आमनेसामने आलेत. याआधी या दोन संघामध्ये सातवेळा स्पर्धा रंगली होती.  रविवारी होणाऱ्या स्पर्धेआधी सुनंदन लेले यांनी भारतीय संघाला मोलाचा सल्ला दिलाय.


आशिया चषक म्हटले की भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना, त्यासाठीच संयोजक झटत असतात असे डोक्यात येते. भारत आणि पाकिस्तान फायनलला यावेत असे वेळापत्रकही ठरवलेले असते. पण असे होत मात्र नाही. मागील अनेक वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान या दोन संघामध्ये फायनलची लढत झालेली नाही. रविवारी भारत आणि गतविजेत्या श्रीलंका या दोन संघामध्ये होणार आहे.  


गतविजेत्या श्रीलंका संघाने पाकिस्तानचा पराभव करत दिमाखात फायनलमध्ये प्रवेश केला. कागदावर भारतीय संघ श्रीलंकेपेक्षा अधिक मजबूत दिसत आहे. कारण, भारतीय संघात अनुभवाचा भरणा आहे. टीम इंडियात एकापेक्षा एक दिग्गज आहेत. त्याशिवाय गुणवंत खेळाडूही आहेत. पण अनुभव आणि गुणवत्ता योग्य वेळी कामाला येणार का? अशी शंका मनात सतावते. कारण, बांगलादेशविरोधात भारतीय संघाला पराभवचा सामना करावा लागला होता. बांगलादेशविरोधात काही कारण नसताना भारताचा पराभव झाला. पण रविवारी भारताला पुन्हा तीच चूक महागात ठरु शकतो. कारण हा आशिया चषकाचा अंतिम सामना आहे. 


गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय संघाला मल्टीनॅशनल स्पर्धेत विजय मिळवता आला नाही.  आयसीसी असो अथवा आशिया चषकात भारताला जेतेपद मिळवता आला नाही. आशिया चषकाच्या जेतेपदावर टीम इंडियाला नाव कोरावेच लागेल. त्यासाठी भारतीय संघाला काही गोष्टी कराव्या लागतील. संथ खेळपट्टीवर एकेरी दुहेरी धावसंख्या काढण्याचे तंत्र शोधावे लागेल. श्रीलंका संघातील फिरकी गोलंदाज तुम्हाला मोठे फटके मारु देणार नाही, त्यामुळे एकेरी दुहेरी धावसंख्यावर भर द्यावा लागेल. आशिया चषकाच्या फायनलमध्ये श्रीलंका संघाविरोधात भारतीय संघ कमकुवत चेंडूवर एकेरी दुहेरी धावसंख्या काढावी लागेल.


महिश तिक्ष्णाच्या अनुपस्थितीचा फटका श्रीलंकेला बसणार आहे. पण मागील काही सामन्यात कामचलाऊ फिरकी गोलंदाजांनी दर्जेदार गोलंदाजी केली. रविवारीच्या सामन्यात भारतीय संघाला सकारात्मक क्रिकेट खेळावे लागेल.