IND vs SL 2nd Test: भारताने वेस्ट इंडीज (IND vs WI) संघाला आधी एकदिवसीय आणि नंतर टी20 मालिकेत व्हाईट वॉश दिला. त्यानंतर आता भारतीय भूमीतच श्रीलंका भारताविरुद्ध (IND vs SL) सामने पार पडत असून टी20 सामन्यांच्या मालिकेत भारताने क्लीन स्वीप दिला. ज्यानंतर आता कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकल्यानंतर दुसरा सामना जिंकून भारत व्हाईट वॉश देऊ शकतो. तर या सामन्याला आता काही तास शिल्लक असल्याने हा सामना कधी आणि कुठे पाहता येणार यावर एक नजर फिरवूया...


कुठे खेळवला जाणार सामना?


दुसरा कसोटी सामना बंगळुरुच्या एम. चिन्नस्वामी मैदानात खेळवला जाणार आहे.


कधी खेळवला जाणार सामना?


भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना उद्या 12 मार्च रोजी दुपारी दोन वाजता खेळवला जाणार आहे.  


कुठे पाहाल सामना?


हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेल्सवर पाहता येणार आहे. तसंच हॉटस्टारवर देखील सामना थेट प्रक्षेपित होईल.


असा पार पडला पहिला सामना


पहिल्या कसोटीत नाणफेक जिंकत भारताने फलंदाजाची निर्णय घेतला. पहिल्या दिवशी भारतीय संघाने 85 षटकांत 6 बाद 357 धावा केल्या. पहिल्या दिवशी ऋषभ पंतने 97 चेंडूमध्ये 96 धावा केल्या. तर हनुमा विहारीने 128 चेंडूत 58 धावा केल्या. तर कोहली 45 धावा करुन तंबूत परतला. दुसऱ्या दिवशी जाडेजाने उत्तम सुरुवात केली त्याला आश्विनची साथ मिळाली. आश्विन 61 धावा करुन बाद झाला तर जाडेजा 175 धावांवर नाबाद राहिला. अखेर 574 धावांवर भारताने डाव घोषित केला. ज्यानंतर श्रीलंकेच्या फलंदाजांनी पहिल्या दिवस अखेर 108 धावा करत 4 विकेट गमावल्या. ज्यानंतर तिसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास 6 विकेट्स भारताने मिळवल्या. ज्यानंतर श्रीलंकेला फॉलोऑन मिळाल्याने श्रीलंकेने दुसरा डाव सुरु केला. ज्यात एन. डिकवेला (नाबाद 51) याच्याशिवाय एकाही फलंदाजाला खास कामगिरी करता न आल्याने 178 धावांवर श्रीलंका पुन्हा सर्वबाद झाली. ज्यामुळे भारताने एक डाव आणि 222 धावांनी सामना जिंकत दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे.


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha