IND vs WI 3rd T20 : अखेरच्या टी-20 सामन्यात भारताचा 17 धावांनी विजय

IND vs WI 3rd T20 LIVE Updates: भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात सुरु असलेल्या तीन टी-20 मालिकेतील सुरुवातीचे पहिले दोन सामने जिंकत भारतानं मालिकेवर कब्जा केलाय.

abp majha web team Last Updated: 20 Feb 2022 11:09 PM
अखेरच्या टी-20 सामन्यात भारताचा 17 धावांनी विजय

भारताविरुद्ध कोलकात्याच्या ईडन गार्डन खेळण्यात आलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतानं 17 धावांनी विजय मिळवलाय.

Ind Vs WI: भारत विजयापासून दोन विकेट्स दूर

भारत विजयापासून दोन विकेट्स दूर आहे. वेस्ट इंडीजनं 158 धावांवर 8 विकेट्स गमावले आहेत. वेस्ट इंडीजचा स्कोर- 158/8 (18.5)


 


 

भारताचं वेस्ट इंडीजसमोर धावांचं लक्ष्य

कोलकात्याच्या ईडन गार्डनवर सुरु असलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतानं वेस्ट इंडीजच्या संघासमोर 185 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. 

भारताला चौथा झटका, रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतला

वेस्ट इंडीजविरुद्ध तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताची खराब सुरुवात झालीय. ड्रेक्सच्या गोलंदाजीवर रोहित शर्मा बाद झालाय. त्यानं 15 चेंडूत केवळ 7 धावा केल्या आहेत. भारताचा स्कोर- 94/4 (14.1) 

ईशान किशन बाद, रॉस्टन चेसच्या गोलंदाजीवर गमवली विकेट्स

रॉस्टन चेसच्या गोलंदाजीवर भारताचा युवा फलंदाज ईशान किशननं आपली विकेट्स गमावली आहे. भारताचा स्कोर- 66/3 (9.4) 

भारताला पहिला धक्का

सलामी फलंदाज ऋतुराज गायकवाड बाद, भारताला पहिला धक्का

वेस्ट इंडीजचा नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय

भारताविरुद्ध तिसऱ्या आणि अखेरच्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडीजनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय.

IND Vs WI: तिसऱ्या टी-20 सामन्यात विराट कोहली, ऋषभ पंतला विश्रांती

वेस्ट इंडीज विरुद्ध तिसऱ्या टी-20 सामन्यात विराट कोहली, ऋषभ पंतला विश्रांती देण्यात आलीय. 

पार्श्वभूमी

IND vs WI 3rd T20 LIVE Updates: भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात सुरु असलेल्या तीन टी-20 मालिकेतील सुरुवातीचे पहिले दोन सामने जिंकत भारतानं मालिकेवर कब्जा केलाय. या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना कोलकाता (Kolkata) येथील ईडन गार्डनवर (Eden Gardens) आज (20 फेब्रुवारी) खेळला जाणार आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप देण्याचा प्रयत्न करणार आहे. 


विराट कोहली, ऋषभपंतला विश्रांती
भारताला कोलकात्याच्या मैदानावर वेस्ट इंडिज संघाविरुद्ध तिसरा आणि अखेरचा टी-20 सामना खेळायचा आहे. मात्र, या सामन्यात विराट कोहली आणि ऋषभ पंतला विश्रांती देण्यात आलीय. कोहलीला श्रीलंका मालिकेपूर्वी बायो बबलमधून ब्रेक देण्यात आलाय, अशी माहिती पीटीआय वृत्तसंस्थेनं दिलीय. विराट कोहलीनं वेस्ट इंडीजद विरुद्ध तीन सामन्याची एकदिवसीय मालिका आणि दोन टी-20 सामने खेळले आहेत.


ऋतुराज गायकवाडला संधी मिळण्याची शक्यता
विराट कोहलीच्या जागेवर ऋतुराज गायकवाडला संधी मिळण्याची शक्यता आहे. ऋतुराज गायकवाड फॉर्ममध्ये आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्यानं आपली छाप सोडलीय. महत्वाचं म्हणजे, ऋतुराज गायकवाडनं केवळ दोनच आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले आहेत. ज्यात 125 च्या सरासरीनं त्यानं 35 धावा केल्या आहेत. 21 ही त्याची टी-20 क्रिकेटमधील सर्वाधिक स्कोर आहे. 


संघ- 


भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, रवी बिश्नोई, युजवेंद्र चहल, दीपक हुड्डा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आवेश खान. 


वेस्ट इंडीजचा संघ- 
निकोलस पूरन (विकेटकिपर), किरॉन पोलार्ड (कर्णधार), ब्रँडन किंग, काइल मेयर्स, रोव्हमन पॉवेल, जेसन होल्डर, रोस्टन चेस, ओडियन स्मिथ, अकेल होसेन, रोमॅरियो शेफर्ड, शेल्डन कॉट्रेल, फॅबियन ऍलन, शाई होप, डॅरेन ब्राव्हो, डॉमिनिक ड्रेक्स, हेडन वॉल्श. 


हे देखील वाचा- 


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.