IND vs SL 2nd Test Preview: भारत आणि श्रीलंका यांच्यात उद्या (12 मार्च) अखेरचा कसोटी सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळवून घरच्या मैदानावर सलग 15 वी कसोटी मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघ सज्ज झालाय. दरम्यान, 2012-13 साली भारत दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेत भारतानं अखेरची मालिका गमावली होती. त्यानंतर भारतानं मायदेशात सलग 14 कसोटी मालिका जिंकल्या आहेत.
रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मालिका जिंकण्यासाठी सज्ज
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पहिली कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतानं एक डाव आणि 222 धावांनी श्रीलंकेच्या संघाला पराभूत करून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात दुसरा कसोटी सामना 12-16 मार्चदरम्यान बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्डेडिएमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ श्रीलंकेला क्लीन स्वीप देण्याचा प्रयत्न करेल.
विराट कोहलीच्या शतकाचा दुष्काळ संपण्याची शक्यता
श्रीलंकाविरुद्ध खेळला जाणार दुसरा एकदिवसीय सामना विराट कोहलीसाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. कारण, या विराट कोहलीनं आयपीएलमध्ये रॉयल चॅलेजर्सकडून खेळताना या मैदानात जास्त वेळ घालवला आहे. तसेच या मैदानावर विराट कोहलीनं 16 कसोटी, 21 एकदिवसीय आणि 25 टी-20 सामने खेळले आहेत. विराटनं मागील 28 महिन्यापासून एकही शतक झळकावलं नाही. मात्र, या सामन्यात तो शतक ठोकून शतकांचा दुष्काळ संपवण्याची शक्यता आहे.
भारताचा कसोटी संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अग्रवाल, प्रियांक पांचाळ, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋषभ पंत, केएस भरत, आर अश्विन, जडेजा, जयंत यादव, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, सिराज, उमेश यादव, सौरव कुमार.
श्रीलंकेचा कसोटी संघ:
दिमुथ करुणारत्ने, पथुम निसांका, लाहिरू थिरिमाने, धनंजय डी सिल्वा, कुशल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडिमल, चरित अस्लंका, निरोशन डिकवेला, चमिका करुणारत्ने, रमेश मेन्डिस, लाहिरू कुमारा, सुरंगा लकमल, दुष्मंता चमीरा, विश्व फर्नांडो, जेफरी वांडरसे, परवीन जयविक्रमा, लसिथ एम्बुलडेनिया.
हे देखील वाचा-
- IPL 2022 : मलिंगाची आयपीएलमध्ये एन्ट्री, मुंबई नव्हे ‘या’ संघासोबत करणार काम
- IND vs SL: श्रीलंकाविरुद्ध दुसऱ्या कसोटीत विराट कोहली इतिहास रचणार! मार्क वॉचा 'हा' विक्रम मोडण्यापासून फक्त 23 धावा दूर
- Pink Ball Test: पिंक बॉल कसोटीत टीम इंडियाच्या 'या' खेळाडूंच्या सर्वाधिक धावा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha