Ind vs SL 2nd T20: भारत आणि श्रीलंका (India vs Sri lanka) यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना पल्लेकेले येथे खेळवला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 9 विकेट्स गमावत 161 धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियाला विजयासाठी 162 धावांचे आव्हान असणार आहे. 


श्रीलंकेकडून फलंदाजी करताना कुशल परेराने सर्वाधिक 53 धावा केल्या. पाथुम निसांकाने 32, कुशल मेंडिसने 10, कामिंदू मेंडिसने 26, तर चारिथ असालंकाने 14 धावा केल्या. भारताकडून रवी बिश्नोईने 3 विकेट्स घेतल्या. तर हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंग, अक्षर पटेलने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. 






टीम इंडियाकडून संजू सॅमसनला संधी-


दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. टीम इंडियाने संघात एक बदल केला असून शुभमन गिलच्या जागी संजू सॅमसनला संधी देण्यात आली आहे. शुभमन गिलला सराव करताना दुखापत झाल्याने त्याला विश्रांती देण्यात आली आहे, अशी माहिती कर्णधार सूर्यकुमार यादवने दिली. तर श्रीलंकाचा संघ देखील एक बदलासह मैदानात उतरला आहे.


भारताची प्लेइंग इलेव्हन-


भारत : यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रायन पराग, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज.


श्रीलंकेची प्लेइंग इलेव्हन-


श्रीलंका : पाथुम निसांका, कुसल मेंडिस, कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, चारिथ असालंका, दासुन शानाका, वानिंदू हसरंगा, महेश थेक्षाना, मथिशा पाथिराना, असिथा फर्नांडो, रमेश मेंडिस.


टीम इंडियाचा पहिला टी-20 सामन्यात विजय-


टीम इंडियाने मालिकेची सुरुवात विजयाने केली आहे. मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरची ही पहिलीच मालिका आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवने टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी केली. श्रीलंकेच्या संघाने भारताला कडवी टक्कर दिली होती. त्यामुळे दुसऱ्या सामन्यातही भारतासाठी विजय सोपा असणार नाही. शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांनी पहिल्या टी-20 सामन्यात दमदार सुरुवात केली होती. यानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने अर्धशतक झळकावले होते. हार्दिक पांड्या आणि रियान परागसारख्या फलंदाजांनी निराशा केली असली तरी टीम इंडियाला 200 धावांचा टप्पा ओलांडण्यात यश आले. त्यानंतर गोलंदाजी कमाल दाखवत भारताने 43 धावांनी विजय मिळवला होता.


संबंधित बातमी:


IND vs SL : भारत अन् श्रीलंका मॅचमध्ये अजब प्रकार, एकाच गोलंदाजाची उजव्या अन् डाव्या हातानं बॉलिंग, पाहा काय घडलं?