IND vs SL, Toss Update : दुसऱ्या सामन्यात नाणेफेकीचा कौल श्रीलंकेच्या बाजूने, प्रथम फलंदाजीचा घेतला निर्णय
IND vs SL : भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर सुरु एकदिवसीय सामन्यात नुकतीच नाणेफेक पार पडली असून श्रीलंकन कर्णधार दासूनने फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
![IND vs SL, Toss Update : दुसऱ्या सामन्यात नाणेफेकीचा कौल श्रीलंकेच्या बाजूने, प्रथम फलंदाजीचा घेतला निर्णय IND vs SL 2nd ODI Toss Update Sri Lanka won toss and elected to bat first IND vs SL, Toss Update : दुसऱ्या सामन्यात नाणेफेकीचा कौल श्रीलंकेच्या बाजूने, प्रथम फलंदाजीचा घेतला निर्णय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/12/10d6e70ca0b520571d13e6f898e7da941673508183855224_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
India vs Sri Lanka : भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातीस दुसऱ्या एकदिवसीय सामन्याला कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर सुरुवात होत आहे. नाणेफेक जिंकत श्रीलंका संघाने फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मागील सामन्यात प्रथम फलंदाजी भारताने केली असता एक विशाल लक्ष्य भारताने उभारलं, त्यामुळे श्रीलंकेकडून चांगली फलंदाजी होऊनही ते पराभूत झाले. ज्यामुळे आज स्वत: आधी फलंदाजी करत एक मोठी धावसंख्या उभारण्याचा श्रीलंकेचा डाव आहे.
View this post on Instagram
तसंच आजची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल असल्याने एक मोठी धावसंख्या श्रीलंका उभारु शकते. याशिवाय दोन्ही संघामध्ये आजच्या सामन्यासाठी काही बदल करण्यात आले आहे. भारतीय संघात युजवेंद्र चहच्या जागी कुलदीप यादवला संधी दिली गेली आहे. तर श्रीलंकेच्या संघात दिलशान मदुशंकाच्या जागी लाहिरू कुमारा खेळत असून नुवानिडू फर्नांडो हा युवा खेळाडू पाथुम निसंकाच्या जागी संघात येऊन पदार्पण करत आहे.
कशी आहे टीम इंडिया?
रोहित शर्मा(कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकिपर),श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, उमरान मलिक, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव
कसा आहे श्रीलंकेचा संघ?
अविष्का फर्नांडो, नुवानिडू फर्नांडो, कुसल मेंडिस(विकेटकिपर), चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दासुन शनाका(कर्णधार), वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, दुनिथ वेललागे, लाहिरू कुमारा, कसुन राजिथा
कसा आहे आजवरचा इतिहास?
भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात आतापर्यंत तब्बल 163 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता भारतानं यामध्ये 94 सामने जिंकले असून श्रीलंका संघाला 57 सामने जिंकण्यात यश आलं आहे. याशिवाय दोघांमधील एकूण 11 सामने अनिर्णित राहिले आहेत. तसंच एक सामना बरोबरीत सुटला आहे. त्यामुळे या सर्व सामन्यांचा विचार करता भारतीय संघाचा दबदबा श्रीलंकेवर एकदिवसीय सामन्यांमध्ये असल्याचं दिसून येत आहे.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)