IND vs SL, 2nd ODI : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना खेळवला जात असून नाणेफेक जिंकत श्रीलंका संघाने फलंदाजी निवडली आहे. दोन्ही संघानी पहिल्या वन-डेच्या तुलनेत काही बदल करत मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी टीम इंडियाने एक बदल केला असून श्रीलंकेचा संघ दोन बदलांसह मैदानात उतरत आहे.


भारतीय संघाचा विचार करता फिरकीपटू युजवेंद्र चहल यांला खांद्याचा थोडा त्रास होत असल्याने त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बीसीसीआयने याबाबत अधिकृत ट्वीट करत माहिती दिली आहे. ज्यामुळे चहलच्या जागी कुलदीप यादव याला संधी दिली आहे.



 

दुसरीकडे श्रीलंका संघाचा विचार करता श्रीलंकेच्या संघात दिलशान मदुशंकाच्या जागी लाहिरू कुमारा खेळत आहे. दिलशानला पहिल्या सामन्यात दुखापत झाल्यामुळे त्याला संघाबाहेर ठेवलं आहे. दुसरीकडे युवा फलंदाज नुवानिडू फर्नांडो याला संधी देण्यात आली असून तो एकदिवसीय संघात पदार्पण करत आहे. पाथुम निसंकाच्या जागी त्याला संधी मिळाली आहे.तर नेमके दोन्ही संघ कसे आहेत पाहूया..

 

टीम इंडिया


रोहित शर्मा(कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकिपर),श्रेयस अय्यर,  हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, उमरान मलिक, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव 


श्रीलंकेचा संघ


अविष्का फर्नांडो, नुवानिडू फर्नांडो, कुसल मेंडिस(विकेटकिपर), चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दासुन शनाका(कर्णधार), वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, दुनिथ वेललागे, लाहिरू कुमारा, कसुन राजिथा




हे देखील वाचा-